एक्स्प्लोर

अदर पुनावाला यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गांभीर्याने घ्या, मुंबई उच्च न्यायालयाकडून केंद्र आणि राज्य सरकारला खडे बोल

अदर पुनावाला (ADAR POONAWALA) यांना सध्या 'वाय' दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्यावतीने खंडपीठाला देण्यात आली. तर दुसरीकडे, केंद्र सरकारकडून पुनावाला यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे जवानही तैनात करण्यात आल्याचंही कोर्टात सांगण्यात आलं.

मुंबई : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदर पुनावाला यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गांभीर्याने घ्या, अशी आठवण मंगळवारी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला करून दिली. तसेच पुनावाला यांच्या सुरक्षिततेबाबतचा अहवाल पुढील सुनावणीत सादर करण्याचे निर्देश दिले प्रशासनाला दिले आहेत. कोरोनाच्या कठीण काळात कोविशिल्ड ही लस तयार करून देशाच्या हितासाठी भरीव कामगिरी केली आहे, याचा हायकोर्टानं पुनर्उच्चार केला. 

पुनावाला यांना सध्या 'वाय' दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्यावतीने खंडपीठाला देण्यात आली. तर दुसरीकडे, केंद्र सरकारकडून पुनावाला यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे जवानही तैनात करण्यात आल्याचंही कोर्टात सांगण्यात आलं. त्यावर पुनावाला यांच्या सुरक्षिततेसाठी सीआरपीएफचे किती जवान तैनात करण्यात आले आहेत?, अशी विचारणा खंडपीठाने केली तसेच देश कठीण परिस्थितीतून जात असताना देशासाठी मोठं आणि भरीव योगदान देणाऱ्या पुनावाला यांच्या सुरक्षितेचा मुद्दा गांभीर्याने घ्या असे केंद्र आणि राज्य सरकारला सुनावत त्यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी 10 जूनपर्यंत तहकूब केली.

सध्या देशात सर्वत्र कोरोनावरील लसींचा तुटवडा जाणवत आहे. मुंबईसह माहराष्ट्रात लसींअभावी लसीकरण प्रक्रियेला खीळ बसली आहे. त्यातच पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांना लसीसाठी अनेक बड्या राजकीय व्यक्तींकडून धमक्यांचे फोन आले असा गौप्यस्फोट पुनावाला यांनी युकेतील एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना केला होता. पुनावाला हे सध्या आपल्या कुटुंबियांसोबत ब्रिटन मध्ये निघून गेले आहेत. त्यामुळे पुनावाला यांना धमकवणाऱ्या लोकांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत अँड. दत्ता माने यांनी एका जनहित याचिकेतून केली आहे. तसेच पुनावाला यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची तरतूद करावी असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर व्हीसीमार्फत सुनावणी पार पडली. 

संबंधित बातम्या :

अदर पुनावालांचं देशासाठी भरीव योगदान, अशा व्यक्तीला धमक्या येणं गंभीर, तातडीनं दखल घ्यायला हवी : हायकोर्ट

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates : महाराष्ट्राच्या राजकारणात अन् प्रशासनात मोठ्या घडामोडी; मनोज जरांगे पाटलांचे आजपासून आमरण उपोषण, तर पुण्यात विषारी दारूकांडानंतर पोलिसांवर बडगा!
Maharashtra Live Updates : महाराष्ट्राच्या राजकारणात अन् प्रशासनात मोठ्या घडामोडी; मनोज जरांगे पाटलांचे आजपासून आमरण उपोषण, तर पुण्यात विषारी दारूकांडानंतर पोलिसांवर बडगा!
Mumbai CNG News : मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंचं आजपासून पुन्हा अंतरवालीत आमरण उपोषण; नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
मनोज जरांगेंचं आजपासून पुन्हा अंतरवालीत आमरण उपोषण; नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
Manwath Accident News : भीषण अपघात! ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, चार तरुणांचा जागीच दुर्दैवी अंत; दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर, परभणीच्या मानवत शहरातील घटना
भीषण अपघात! ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, चार तरुणांचा जागीच दुर्दैवी अंत; दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर, परभणीच्या मानवत शहरातील घटना

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai CNG News : मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
Jalgaon Crime News: वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Vaibhav Sooryavanshi RR vs GT IPL 2026: पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Embed widget