मुंबई : राज्य सरकारकडून सलग दुसऱ्या वर्षी नागरिकांना आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) दिला जातोय. मात्र राज्यात अनेक ठिकाणी आनंदाचा शिधा देत असताना वजनात तूट होत असल्याचा अनुभव ग्राहकांना येतोय. प्रत्येक पदार्थांमध्ये 15 ते 20 ग्रॅम घट झाल्याचं पाहायला मिळतंय. यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) सरकारवर निशाणा साधला आहे. आनंदाचा शिधाच्या माध्यमातून नफेखोरीचा फायदा कोणाला होतोय ? शिधाचे कंत्राट देणारे कंत्राटदार कोणत्या पक्षाचे आणि कोणत्या नेत्यांच्या जवळच्या आहेत त्यांचे नेमके लागेबांधे काय आहेत याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे. 


सुषमा अंधारे म्हणाल्या, आनंदाच्या शिध्याच्या माध्यमातून नफेखोरीचा फायदा नेमका कोणाला होत आहे. शिध्याचे कंत्राट देणारे कंत्राटदार कोणत्या पक्षाच्या आणि कोणत्या नेत्यांच्या जवळच्या आहेत त्यांचे नेमके लागेबांधे काय आहेत याची चौकशी व्हायला हवी. रवा, मैद्याच्या पाकिटात 470, 460 ग्रॅम आहे. रवा, मैद्याच्या पाकिटातील 30 ते  40 ग्रॅम रवा मैदा कुठे जातोय ? आणि असा किती रवा मैदा हा नफेखोरी मध्ये जातोय? याची चौकशी केली पाहिजे. शासन आपल्या दारी म्हणत हे सरकार आनंदाचा शिधा देतोय आणि सर्वसामान्यांचे सरकार म्हणत अशाप्रकारे जर या दिवाळीमध्ये प्रकार घडत असेल तर या सगळ्याची चौकशी व्हावी.


पाकिटातील 30 ते  40 ग्रॅम रवा मैदा कुठे जातोय?


आनंदाच्या शिध्यावरून सुषमा अंधारेंनी शिंदे सरकारवर निशााणा साधला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, आनंदाच्या शिधा योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र्य रेषेखालील लोकांना स्वस्तात फराळाचे पदार्थ वाटप केलं जात आहे. मात्र त्याचं वाटप  खरंच योग्य पद्धतीनं होतंय का, हे पाहायला कुणीच नाही. आम्ही  जेव्हा पाहणी केली तेव्हा काही दुकानांमध्ये रवा आणि मैद्याची पाकिटं 20 ते 30 ग्रॅमने कमी भरली.


कंत्राटदाराचे कोणत्या नेत्यांशी लागेबांधे आहेत याची चौकशी व्हावी 


 एक किलो साखर, एक किलो तेलात दिवाळी होत नाही मात्र बुडत्याला काडीचा आधार म्हणून हेही सरकार करतं. प्रत्येक पाकिटातून 20 ग्रॅम, 30 ग्रॅम म्हणजे एक कोटी पाकिटातून किती मोठ्या प्रमाणावर मलिदा मिळतो. आनंदाच्या शिध्याचे  कंत्राटदार कोण आहे, त्यांचे सरकारशी लागेबांधे आहे का हे तपासायला पाहिजे, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.


हे ही वाचा :