Maharashtra Train Accident : नवी मुंबई : राज्यात एक मोठा रेल्वे अपघात (Railway Accident) झाला आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई पुणे चौपदरी मार्गावरून (Mumbai Panvel Four Way Road) जाणारी एक गाडी पुलावरुन खाली पडली आणि पुलाखालून जाणाऱ्या मालगाडीवर आदळली. पनवेल पोलिसांनी (Panvel Police) अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे 3 ते 4 वाजताच्या दरम्यान गाडी मुंबई-पनवेल चौपदरी मार्गावरून नेरळकडे जात असताना ही घटना घडली. धर्मानंद गायकवाड (41) आणि त्यांचे चुलत भाऊ मंगेश जाधव (46) आणि नितीन जाधव (48) अशी अपघातातील मृतांची नावं असल्याची माहिती पनवेल पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.


पहाटे साडेतीन वाजता घटना घडली


मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी कर्जत आणि पनवेल रेल्वे स्थानकांदरम्यानच्या पुलावरून एक कार चालत्या मालगाडीवर पडली, त्यात तीन जण ठार, तर दोघे जखमी झाले आहेत. पनवेल पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान कार मुंबई-पनवेल महामार्गावर नेरळकडे जात असताना हा अपघात झाला.


महाराष्ट्र में एक बड़ा सड़क-रेल हादसा सामने आया है. हादसा मंगलवार सुबह हुआ, जिसमें एक कार पुल से गिर गई और नीचे से गुजर रही मालगाड़ी पर जा गिरी. पनवेल पुलिस ने दुर्घटना के बारे में जानकारी दी है. पुलिस के मुताबिक, घटना सुबह 3.30 से 4 बजे के बीच हुई जब कार फोर-लेन मुंबई-पनवेल रोड पर नेरल की ओर जा रही थी.


मंत्री रामदास आठवलेंकडून दुःख व्यक्त 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत धर्मानंद गायकवाड हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (आठवले गट) कार्यकर्ता होते. आरपीआयचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.


गाडी घसरल्यानंतर मालगाडीचे डब्बे वेगळे झाले


अपघाताबाबत मध्य रेल्वेचे (सीआर) जनसंपर्क संचालक डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितलं की, मालगाडी पनवेलहून रायगड जिल्ह्यातील कर्जतच्या दिशेनं जात होती आणि या घटनेमुळे तिचे काही डब्बे वेगळे झाले. ते म्हणाले की, अपघातामुळे सीआर हायवेचा पनवेल-कर्जत रस्ता पहाटे 3 ते सकाळी 7.32 पर्यंत बंद होता. ते म्हणाले की, या घटनेमुळे कर्जत-कल्याण मार्गावरून फक्त हुबळी-दादर एक्स्प्रेस (17317) वळवण्यात आली होती.