Nashik Rain Update : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर (Igatpuri) तालुक्यात संततधार पाऊस (Rain) सुरूच आहे. यामुळे धरणांमधील पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मागील दोन दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असून त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) शहरात रस्ते पाण्याखाली गेले आहे. मागील 24 तासांत सुरगाणा तालुक्यात 105 मिलिमीटर, त्र्यंबकेश्वर तालुक्यात 50 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक पाऊस सुरगाणा (Surgana) तालुक्यात बरसला आहे.
नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढला
गेल्या तीन दिवसांपासून नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाने सुरुवात केली असून शनिवारी रात्रीपर्यंत पाऊस (Rain) सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठ पर्यंतच्या 24 तासांत जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सरासरी 17.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आजच्या आकडेवारीनुसार, नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत सुरगाणा तालुक्यात 105 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून त्या खालोखाल पेठ तालुक्यात 88 मिलीमीटर, त्र्यंबकेश्वर तालुक्यात 50 मिलिमीटर तर इगतपुरी तालुक्यात 63 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यात संततधार कायम
याशिवाय बागलाण, कळवण, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यात देखील सतदार पावसाने (Rainy Season) हजेरी लावली आहे. इगतपुरी तालुक्यात पडत असलेला पाऊस पालखेड धरण समूहातील काही धरणांसाठी फायदेशीर ठरत असून या धरणांमधील पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ झाल्याने शहरवासियांसाठी हा दिलासा आहे. दारणा धरणा सर्वाधिक तीन टक्क्यांनी पाणी वाढले आहे. इगतपुरीत सलग चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून शुक्रवारी देखील संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे दारणा गोदावरी नदीमधील पाणी पातळीत वाढ होत आहे.
24 तासांपासून पावसाची संततधार
त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर तालुक्यातही पावसाचा जोर कायम असून गंगापूर, गिरणा धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात हळूहळू वाढ होत आहे. मात्र, नाशिक तालुका परिसरात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा असून यामुळे गंगापूर धरण समूहांमधील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. दरम्यान गुरुवारी जिल्ह्यातील इगतपुरीत 73 मिलिमीटर, सुरगाणा 58 मिलिमीटर, त्र्यंबकेश्वर 65 मिलिमीटर, पेठ 97 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम असून पेठ तालुक्यात 88 मिलिमीटर, इगतपुरी 63 मिलिमीटर, त्र्यंबकेश्वर 50 मिलिमीटर, कळवण 33 मिलिमीटर, दिंडोरी 52 मिलिमीटर अशी पावसाची नोंद झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :