Buldhana Accident: समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) पिंपळखुटा गावाजवळ झालेला अपघातानं अवघा महाराष्ट्र (Maharashtra News) हादरला. या अपघातात तब्बल 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. नागपूरहून (Nagpur News) पुण्याला (Pune News) जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला. नागपूरहून निघालेली ही बस रात्री साडे नऊ वाजता यवतमाळहून पुण्याकडे निघाली होती. मध्यरात्री दीड वाजता हा अपघात झाला. दरम्यान, या अपघातापूर्वीचं बसचं शेवटचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. 


वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील न्यू राधाकृष्ण रेस्टॉरंट या ठिकाणी काल रात्री 9.50 मिनिटांनी विदर्भ ट्रॅव्हल्स जेवणासाठी थांबली होती. त्या ठिकाणचा EXCLUSIVE CCTV व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. अपघात होण्यापूर्वी जेवणासाठी वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड या ठिकाणी ही विदर्भ ट्रॅव्हल्स थांबली होती. प्रवाशांची जेवणं आटोपल्यानंतर ही ट्रॅव्हल्स रात्री साडेदहा वाजता पुण्यासाठी रवाना झाली होती. पण काही तासांच्या अंतरावरच या ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. ज्यात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 


पाहा अपघातापूर्वीचा ट्रॅव्हल्सचा शेवटचा व्हिडीओ : EXCLUSIVE CCTV



पिंपळखुटातील गावकऱ्यांनी केली मदत 


समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या अपघातानंतर अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पिंपळखुटा या गावातील लोक तातडीनं मदतीसाठी धावले. अचानक मोठा आवाज झाल्यानं गावातील जवळपास दहा ते पंधरा लोक खळबडून जागे झाले आणि ते लगेचच अपघातस्थळी रवाना झाले. 


नेमका अपघात कसा झाला? बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक सांगतात... 


"बस रात्री 1.35 च्या सुमारास नागपूरहून पुण्याकडे जात असताना सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावानजीक एका खांबावर जाऊन आदळली. याबाबत ड्रायव्हरला विचारलं असता टायर फुटल्यानं बस जाऊन आदळल्याचं त्यानं सांगितलं. त्यानंतर खांब बाजूला जाऊन उडाला. त्याचवेळी बस पुढे जाणाऱ्या डिझेल टँकरवर जाऊन आदळली. डिझेल टँकचा स्फोट झाला आणि मोठ्या स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर गाडी सुमारे 30 ते 40 फुट पुढे जाऊन पलटी झाली आणि अचनाक गाडीत आग लागली.", अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली. तसेच, गाडीचा अपघात झाला त्यावेळी प्रवासी गाडीत झोपले होते. त्यामुळे गाडीचा अपघात झाला याबाबत अनेकांना कल्पना नव्हती. त्यावेळी जेवढे प्रवासी काचा फोडून बसबाहेर पडले, तेवढे प्रवासी सुखरुप बचावले आहेत, अशी माहितीही पोलीस अधिक्षकांनी दिली आहे. 


बसमधील सर्वाधिक प्रवासी हे नागपूरचे होते. त्यानंतर बस मध्ये यवतमाळला थांबली होती. त्यामुळे यवतमाळमध्येही काही प्रवासी बसमध्ये चढल्याची माहिती मिळत आहे. अजून कोणते प्रवासी कुठून बसमध्ये चढले याबाबत मात्र योग्य माहिती अद्याप हाती आलेली नाही, असंही पोलीस अधिक्षकांनी सांगितलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Buldhana Accident : दुर्घटनाग्रस्त बस आधी लोखंडी पोलवर आदळली, मग पलटी झाली अन् अचानक भीषण आग लागली; नेमका कसा घडला अपघात?