एक्स्प्लोर
सुप्रिया सुळेंची मुलगी रेवतीचं आजोबांसोबत मतदान

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवतीने पहिल्यांदाच मतदान केलं. रेवतीने आजोबा शरद पवार यांच्यासह मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. रेवती आणि शरद पवार यांनी वॉर्ड क्रमांक 214 मध्ये मतदान केलं. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवारच नाही.
त्यामुळे शरद पवार आणि रेवतीने कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केलं, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. वॉर्ड क्रमांक 214 मध्ये शिवसेनेकडून अरविंद बने, भाजपकडून अजय पाटील, काँग्रेसचे कौशिक शहा आणि मनसेचे धनराज नाईक रिंगणात आहेत.
त्यामुळे शरद पवार आणि रेवतीने कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केलं, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. वॉर्ड क्रमांक 214 मध्ये शिवसेनेकडून अरविंद बने, भाजपकडून अजय पाटील, काँग्रेसचे कौशिक शहा आणि मनसेचे धनराज नाईक रिंगणात आहेत. आणखी वाचा























