आपल्या कुटुंबाचा आत्तापर्यंतचा प्रवास महाराष्ट्राला माहिती आहे. सत्तेच्या खेळासाठी आपल्या कुटुंबात फूट पडायला नको. तुला जे हवे त्यावर आपण चर्चा करु, त्यावर तोडगा काढू. तू पहिल्यांदा राजीनामा दे आणि परत ये, असे भावनिक आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. मात्र, यावर अजित पवारांनी कोणती प्रतिक्रिया दिली हे समजू शकले नाही. आज सकाळी अजित पवार भाजपसोबत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडली आहे. या अनपेक्षित आणि धक्कादायक प्रकारानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी पूर्णपणे गोंधळलेले आहेत.
अजित पवार यांच्या तडकाफडकी निर्णयानंतर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे अजित पवारांची समजूत काढण्यासाठी श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी घेले होते. मात्र, त्यांना अजित पवरांची समजूत काढण्यात अपयश आल्याचे सांगण्यात येत आहे. उलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर भाजपासोबत चला असा निरोप अजित पवारांनी शरद पवारांना आमदारांकरवी पाठवल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर भाजपासोबत चला -
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर भाजपसोबत चला असा निरोप अजित पवार यांनी त्यांची मनधरणी करण्यासाठी गेलेल्या आमदारांमार्फत शरद पवार यांना पाठवला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सकाळी शिवसेनेसोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार यांचा हा वैयक्तीक निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले असून त्यांच्यावर कारवाई करण्याचेही त्यांनी संकेत दिले. दरम्यान, सध्या वाय. बी. चव्हाण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक सुरु आहे. यावेळी अजित पवारांसोबत गेलेले अनेक आमदार परतल्याचे पाहायला मिळाले.
संबंधिक बातम्या -
असा घडला पॉलिटिकल ड्रामा, पाहा संपूर्ण घटनाक्रम
काँग्रेसकडून शरद पवारांना क्लीनचिट; सोनिया गांधी म्हणाल्या पवारांवर पूर्ण विश्वास - सुत्र
अजित पवारांच्या समर्थनातून राज्याला मजबूत सरकार देणार, शपथविधीनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया