दुपारी सव्वाचार वाजता मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात भाजप नेत्यांनी या विजयाचे सेलिब्रेशन केले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, आमदार आशिष शेलार, माजी मंत्री विनोद तावडे उपस्थित होते. यावेळी चारही नेत्यांनी एकमेकांना लाडू भरवून विजय साजरा केला.
देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्व मित्रपक्षांचे, अपक्ष आमदारांचे आणि अजित पवार यांचे खूप खूप आभार. आमचा एक मित्रपक्ष आज सोबत नाही, याची खंत वाटते. परंतु त्यांच्याशिवाय अजित पवार यांच्या पाठिंब्यावर आम्ही एक मजबूत सरकार देऊ.
फडणवीस म्हणाले की, आमची बांधिलकी राज्यातील जनतेशी आहे. इथल्या जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी एक स्थिर सरकार असणे आवश्यक आहे. ते स्थिर सरकार आम्ही देऊ. फडणवीस यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचेही आभार मानले, तसेच त्यांचे कौतुक केले. फडणवीस म्हणाले की, मोदीजी है तो मुमकीन है.
'त्या' निर्णयात शरद पवारही सामील; नवनीत कौर राणांचा गौप्यस्फोट