एक्स्प्लोर

Supriya Sule: सुप्रिया सुळेंचा मोबाईल हॅक करणाऱ्यांनी केली 200 डॉलर्सची मागणी, पुणे पोलिसांचा तपास सुरु

सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षातील 20 पदाधिकाऱ्यांचे व्हाट्सअप हॅक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

Supriya Sule: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षातील 20 पदाधिकाऱ्यांचे व्हाट्सअप हॅक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सुप्रिया सुळे यांच्या खात्यावरून 200 डॉलर्सची मागणी तर पदाधिकाऱ्यांच्या व्हाट्सअप अकाउंट वरून 15 ते 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. हा अकाउंट हॅक करणारा तरुण बिहार राज्यातील असल्याचे सूत्रांची माहिती आहे. या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. 

गेल्या काही दिवसांमध्ये नेत्यांचे फोन हॅक झाल्याच्या बातम्या समोर येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन रविवारी हॅक करण्यात आल्याचं त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं. यानंतर त्यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती. काही तासातच त्यांचा फोन आणि व्हाट्सअप पूर्ववत झाल्याचे सांगण्यात आलं होतं.

फोन आणि व्हाट्सअप हॅक करून केली पैशांची मागणी 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 20 पदाधिकाऱ्यांचं व्हाट्सअप हॅक झाल्याची माहिती आहे. सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक झाल्यानंतर त्यांच्या खात्यावरून 200 डॉलरची (साधारणतः 16000 रुपये)  मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच पदाधिकाऱ्यांच्या व्हाट्सअप अकाउंट वरून 15 ते 20 हजार रुपयांची मागणी केल्याचं कळतंय.

अकाउंट हॅक करणारा तरुण बिहारचा 

खासदार सुप्रिया सुळेंसह पदाधिकाऱ्यांचा व्हाट्सअप अकाउंट हॅक करणार तरुण बिहार राज्यातील असल्याची सूत्रांची माहिती आहे. भालकेश कुमार नावाच्या व्यक्तीकडून फोन पे च्या माध्यमातून पैशांची मागणी झाली असून या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

सुप्रिया सुळेंनी काय लिहलं आहे सोशल मिडीयावर?

त्यांचे वॉट्सॲप पूर्ववत झाल्याचे त्यांनी x माध्यमावर पोस्ट केले. त्यात त्या म्हणाल्या...माझा फोन आणि व्हॉट्सॲप सुरू झाले आहेत. व्हॉट्सॲप टीमने मोलाचे सहकार्य केले. यासाठी टीम व्हॉट्सॲप आणि पुणे ग्रामीण पोलिसांचे खूप खूप आभार. यादरम्यान मला जर कोणी मेसेज केला असेल, तर या तांत्रिक बिघाडामुळे मी उत्तर देऊ शकलो नाही त्याबद्दल मी दिलगीर आहोत,” सुळे यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: 'माझ्याकडे तुझे फोटो, पळून आली नाहीस तर फोटो व्हायरल करीन', अल्पवयीन मुलीला गल्लीत एकटे गाठले अन्...; घटनेनं बीडमध्ये खळबळ
'माझ्याकडे तुझे फोटो, पळून आली नाहीस तर फोटो व्हायरल करीन', अल्पवयीन मुलीला गल्लीत एकटे गाठले अन्...; घटनेनं बीडमध्ये खळबळ
Maharashtra Live blog updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा वाचा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Live blog updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा वाचा फक्त एका क्लिकवर...
Akola News: बॅग गळ्यात अडकवली, नवऱ्याला पाठीवर उचलून हॉस्पिटलभर फिरत राहिली, स्ट्रेचर नसल्याने अकोला जिल्हा रुग्णालयात रुग्णांची हेळसांड
बॅग गळ्यात अडकवली, नवऱ्याला पाठीवर उचलून हॉस्पिटलभर फिरत राहिली, स्ट्रेचर नसल्याने अकोला जिल्हा रुग्णालयात रुग्णांची हेळसांड
Mumbai Crime News: मुंबई विमानतळावर 5 कोटींच्या सोने तस्करी प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याला बेड्या; संजय राऊतांचा रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'फडणवीस आता तरी...'
मुंबई विमानतळावर 5 कोटींच्या सोने तस्करी प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याला बेड्या; संजय राऊतांचा रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'फडणवीस आता तरी...'

व्हिडीओ

Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News: सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
LPG Price Hike: घरगुती सिलेंडर दरवाढीनंतर 942 रुपयांवर पोहोचला, नव्यानं भाववाढ होताच सब्सिडी किती मिळणार?
घरगुती सिलेंडर दरवाढीनंतर 942 रुपयांवर पोहोचला, नव्यानं भाववाढ होताच सब्सिडी किती मिळणार?
EPFO: पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज कधी मिळणार? कोट्यवधी खातेदार दोन महिन्यांपासून वेटिंगवर, बॅलन्स कसा चेक करायचा? जाणून घ्या  
EPFO: ईपीएफओकडून 8.25 टक्के व्याज दर जाहीर, खात्यात पैसे कधी येणार? पीएफ खात्यातील शिल्लक कशी चेक करायची? 
Tukaram Mundhe decision about Vada Pav: वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतो; छगन भुजबळांची अट ऐकताच देवेंद्र फडणवीस म्हणाले...
आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतो; छगन भुजबळांची अट ऐकताच देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Gold Rate : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर भारतीयांनी सोने खरेदीचा पॅटर्नच बदलला, एका कृतीने मार्केटमधील सप्लाय वाढला, सोने-चांदीचे दर झटक्यात घसरले
पंतप्रधान मोदींची चाल गेमचेंजर ठरली? फक्त एक आवाहन अन् सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
Embed widget