एक्स्प्लोर

माझ्याविरोधात ईडी, सीबीआयची नोटीस काढून दाखवा, सुप्रिया सुळेंचं सरकारला आव्हान

यंदाच्या निवडणुकाच्या निकालाची मला प्रचंड उत्सुकता असून पक्षांतर केलेल्या लोकांना तिकडे किती मत मिळतात, हे पाहायचं असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

सोलापूर : सरकार विरोधकांवर सूडबुद्धीने ईडी आणि सीबीआय कारवाई करत आहे, असे आरोप विरोधक करत आहेत. त्यामुळेच विरोधी पक्षातील नेते भाजप-शिवसेनेत जात असल्याचा आरोप होत आहे. एकीकडे विरोधकांमध्ये अशा कारवाईची भीती असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माझ्या विरोधात ईडी किंवा सीबीआयची नोटीस काढून दाखवावी, असं सरकारला आव्हान दिलं आहे.

मला पत्रकारांनी विचारलं की तुम्ही सरकारच्या विरोधात आवाज उठवत आहात, मात्र जर तुम्हाला ईडीची नोटीस आली तर आवाज उठवणार का? मी म्हणते की मला ईडी किंवा सीबीआयची नोटीस पाठवूनच दाखवावी, मी चॅलेन्ज देते. मी जर काही केलंच नाही तर मला कशाची नोटीस पाठवणार. सुरुवातीला थोडासा त्रास होईल. मात्र शेवटी मीच जिंकणार, असं म्हणत सुप्रिया सुळे म्हणाल्या

सुप्रिया सुळे 'संवाद ताईंशी' या कार्यक्रमानिमित्त सोलापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी व्यापारी, विद्यार्थी, वकील, वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला. विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरु असलेल्या ईडीच्या चौकशीवरुन त्यांनी सरकारवर निशाणा साधला. आपल्याला ईडी सीबीआयने नोटीस पाठवली तरी मला पर्वा नाही. मला संघर्ष करण्यास मजा येते, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला.

पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर टीका

सुप्रिया सुळे यांनी पक्ष सोडून भाजप, शिवसेनेत जाणाऱ्या नेत्यांवरही टीका केली. जे कोण पक्ष सोडून जात असतील त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. मात्र अनेक वर्ष सोबत असलेले सहकारी सोडून जात असल्याचं दु:खही आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यंदाच्या निवडणुकाच्या निकालाची मला प्रचंड उत्सुकता असून पक्षांतर केलेल्या लोकांना तिकडे किती मत मिळतात, हे पाहायचं असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. तर पक्षांतर केलेल्या नेत्यांमुळे सरकार कोणाचेही आले तरी मंत्री आमचेच होणार असं, म्हणत मिश्कील टीकाही त्यांनी यावेळी केली.

मोबाईल कंपनीने चांगली ऑफर दिली की लोक मोबाईल बदलतात, त्याप्रमाणे ऑफर मिळाली की लोक विचारधारा वगैरे न बघता पक्षांतर करत असल्याची खंत सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवली. सीबीआय, ईडी, बँका आणि साखर कारखाने या चार मुख्य कारणामुळेच लोक पक्षांतर करत असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. आतापर्य़ंत पक्षांतर करणाऱ्या कोणत्याही नेत्याने पक्षाविरुद्ध बोललं नसल्याचे समाधान असल्याचं त्यांनी व्यक्त केलं.

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget