एक्स्प्लोर
पक्षप्रमुख अयोध्येला, बाबरी आंदोलनप्रकरणी चंद्रकांत खैरेंना समन्स
खासदार चंद्रकांत खैरे यांना 1993 च्या अयोध्या आंदोलन प्रकरणात सीबीआय न्यायालयाने समन्स बजावले आहे
औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे राज्यासह अयोध्येतले वातावरण तापलेले आहे. याचवेळी दुसऱ्या बाजूला शिवसेना नेते आणि खासदार चंद्रकांत खैरे यांना 1993 च्या अयोध्या आंदोलन प्रकरणात सीबीआय न्यायालयाने समन्स बजावले आहे. श्रीराम जन्मभूमी प्रकरणात पवनकुमार पांडे यांच्यासह अन्य कारसेवकांवर आरोप निश्चित करण्यात आले होते. त्यावेळी साक्षीदार म्हणून खैरे यांना सीबीआयने घटनास्थळावरून ताब्यात घेतले होते.
1993 सालापासून सुरु असलेल्या या प्रकरणात येत्या 28 नोव्हेंबर रोजी राम जन्मभूमीसंबधीच्या खटल्यावर लखनौ न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीवेळी हजर राहण्यासाठी खैरे यांना समन्स बजावण्यात आले आहे. या प्रकरणावर बोतलाना चंद्रकांत खैरे म्हणाले की, 28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीला मी उपस्थित राहणार आहे.
दरम्यान इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण ठाकरे कुटुंब अयोध्या वारीच्या निमित्ताने राजकीय सीमोल्लंघन करत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब अयोध्या दौऱ्यावर निघाले आहेत. अयोध्या दौऱ्याला उद्धव ठाकरेंसोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरेही आहेत. दुपारी 2 वाजता उद्धव ठाकरे फैजाबाद विमानतळावर उतरतील.
उद्धव ठाकरेंचा अयोध्येतील कार्यक्रम
अयोध्येतल्या क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य असे वेगवेगळे समाज, भोजपुरी सभा यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. 'लक्ष्मण किला'वर उद्धव ठाकरे यांचा साधूसंतांकडून सत्कार होणार आहे. रामचरित मानस आणि रामललांची मूर्ती घेऊन दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे येणार आहेत. पूजेनंतर ते साधूसंतांकडून आशीर्वाद घेतील. 'लक्ष्मण किला'वरील कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळी 5.15 वाजता उद्धव ठाकरे चालत शरयूच्या काठावर जाऊन आरती करतील.
दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता उद्धव ठाकरे राम जन्मभूमीत रामललांचं दर्शन घेतील. दुपारी 12 वाजता पत्रकारांशी तर एक वाजता जनतेशी हिंदी भाषेत संवाद साधतील.
शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मातीचा कलश घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येत जात आहेत. शिवनेरीवर बाल शिवाजी आणि जिजामाता यांना अभिवादन करुन उद्धव ठाकरेंनी माती सोबत घेतली आहे. संजय राऊत, राजन विचारे, एकनाथ शिंदे, विश्वनाथ महाडेश्वरही अयोध्येला गेले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement