नंदुरबार : गांधीनगरकडून पुरी कडे जाणाऱ्या गांधीधाम-पुरी एक्स्प्रेसच्या (Gandhidham Puri Express) डब्याला नंदुरबार रेल्वे स्थानकापासून (Nandurbar Station)अवघ्या काही अंतरावर असताना आग लागली. रेल्वेच्या पॅन्ट्री बोगीला ही आग लागल्याची माहिती आहे. आग लागल्याची माहिती लक्षात आल्याबरोबर रेल्वे प्रशासनाकडून आग लागलेल्या पॅन्ट्री बोगीला अन्य रेल्वे डब्यांपासून वेगळं करण्यात आले. प्रवासी डबे वेगळे करण्यात आल्याने अनर्थ टळला.
या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेमुळे वेस्टर्न रेल्वेच्या वाहतुकीवर विशेष परिणाम होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. ही आग विझवण्यासाठी नंदुरबार अग्निशमन दलाकडून प्रयत्न केले जात असून, रेल्वे पोलिसांनी आणि स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्यासह प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
ही आग नेमकी कशामुळे लागली ही माहिती अद्याप समजू शकलेली नाही. अजूनही आग विझविण्याचे काम सुरू आहेत. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. या आगीत प्राथमिक माहितीनुसार कुठल्याही व्यक्ती जखमी झालेला नाही.
वेस्टर्न रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे की, नंदुरबार स्थानकात प्रवेश करत असताना 12993 गांधीधाम-पुरी एक्स्प्रेसच्या पँट्री कारला आग लागल्याची घटना घडली. आग विझवण्यासाठी स्टेशन आणि ट्रेनमध्ये उपलब्ध अग्निशामक यंत्रांचा वापर करण्यात आला. तसेच अग्निशमन दलाला माहिती देऊन तात्काळ पाचारण करण्यात आले. नंतर लगेच पँट्री कार ट्रेनच्या पुढील आणि मागील भागापासून वेगळी करण्यात आली. वैद्यकीय पथक आणि इतर पॅरामेडिकल कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या घटनेत कुणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही. ट्रेनमध्ये एकूण 22 डबे होते आणि पॅन्ट्री कार ही 13वी होती, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron : ओमायक्रॉनची सौम्य लक्षणे दिसताच स्वतःला असं करा होमक्वारंटाईन, 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी
- Bloomberg Index : वॉरन बफेटने मार्क झुकरबर्गला टाकलं मागे, एलन मस्क कितव्या स्थानी? जाणून घ्या...
- Shehnaaz Gill Photos : गुलाबी रंगाच्या साडीत शहनाज गिलच्या घायाळ करणाऱ्या अदा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha