एक्स्प्लोर
पकडलेल्या नोटांबाबत सहकारमंत्री म्हणतात..

उस्मानाबाद: भरारी पथकाने जप्त केलेल्या 91 लाख 50 हजाराच्या रकमेप्रकरणी, लोकमंगल उद्योग समूहाचे प्रमुख सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'लोकमंगल'च्या जीपमधील पकडलेली रक्कम ऊसाच्या टोळीच्या पेमेंटची होती, असं सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे. सुमारे एक कोटीची रोकड जप्त सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल समूहाची जवळपास एक कोटीची रक्कम काल नगरपालिका भरारी पथकानं जप्त केली. उस्मानाबादच्या उमरगा इथं ही कारवाई केली. नगर पालिका गस्ती पथकानं 91 लाख 50 हजार रुपयांची रक्कम पकडली. टाटा सुमो जीपमधून ही रोकड जप्त केली. जुन्या एक हजार नोटांच्या रूपात ही रक्कम होती. जीपवर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल उद्योग समूहाचं नाव होतं. ही रक्कम लोकमंगल बँकेची असल्याची प्राथमिक माहिती होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. सहकारमंत्र्यांच्या उद्योगसमूहाच्या गाडीतल्या 91 लाखा विषयी कोणतीही कागदपत्र नाहीत.
Before You Go
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















