Satara Lockdown : साताऱ्यात पुन्हा कडक लॉकडाऊन, पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय, काय सुरु, काय बंद?
साताऱ्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. सातारकरांनी आता घरातच राहून प्रशासनाच्या आदेशाचं पालन करावं, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

सातारा : सातारा जिल्हा आजपासून पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार असून अत्यावश्यक सेवाही सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेतच सुरु राहणार आहेत. तर शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन केला जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्यामुळे शनिवारपासून जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. तसेच अत्यावश्यक कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
जिल्ह्यात सध्या शनिवार आणि रविवार वगळता वेळेच्या मर्यादेत दुकानं सुरु होती. परंतु, जिल्ह्यातील कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी साताऱ्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. तसेच हा लॉकडाऊन पुढील आदेशापर्यंत सुरु राहील, असंही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सातारकरांनी आता घरातच राहून प्रशासनाच्या आदेशाचं पालन करावं असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
काय सुरु, काय बंद?
लॉकडाऊनदरम्यान काय बंद राहणार?
- शाळा, महाविद्यालये,कोचिंग क्लासेस बंद
- हॉटेल रेस्टॉरंट बंद, पार्सल सेवा सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत
- कोणत्याही क्रिडा स्पर्धा घेता येणार नाहीत
- सामाजिक सांस्कृतिक धार्मिक प्रार्थनास्थळे बंद
- अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत उघडी राहणार
काय सुरु राहणार?
- किराणा, भाजीपाला, फळ विक्री, डेअरी, बेकरी दुकाने सुरु राहणार
- मटण, चिकन, अंडे, मासे विक्री सुरु राहणार
- रिक्षा, टॅक्सी सुरु राहणार
- खाजगी, सहकारी बँका सुरु राहणार
- सर्व बाजार समित्या सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहणार
- खाजगी वाहतूक सुरु राहणार
- खाजगी बसने 50 टक्के क्षमतेने वाहतूक सुरु राहणार
- पॅट्रोल पंप सुरु राहणार
- दुध संकलन केंद्र सुरु राहणार
- कृषीविषयक सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहणार
- शिवभोजन थाळी केवळ पार्सल सेवा सुरु
- शीतगृह आणि गोदाम सुरु राहणार
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Maharashtra Corona Update: राज्यात शुक्रवारी 8,385 रुग्णांना डिस्चार्ज तर 8,753 नवीन रुग्ण, 'या' जिल्ह्यात एकही रुग्ण नाही
- Vaccination for Pregnant Women: आता गरोदर महिलाही लस घेऊ शकणार, NTAGI शिफारशीनंतर आरोग्य मंत्रालयाचा निर्णय
Before You Go
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
महत्त्वाच्या बातम्या





















