एक्स्प्लोर

Animal Husbandry Recruitment : पशुसंवर्धन विभागातील 2017 आणि 2019 ची भरती रद्द, नवीन भरती प्रक्रिया राबवणार 

Animal Husbandry Recruitment : पशुसंवर्धन विभागातील 2017 आणि 2019 ची भरती रद्द प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. आता नव्याने भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

Animal Husbandry Recruitment : 2017 ची आणि 2019 ची पशुसंवर्धन विभागातील  (Department of Animal Husbandry) भरती  रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबत जीआर (GR) काढून ही माहिती दिली आहे. 2017 ला 138 पदांसाठी तर 2019 ला 729 पदांसाठी जाहिरात काढण्यात आली होती. 2019 च्या भरतीसाठी तब्बल 3 लाख 29 हजार 689 अर्ज विद्यार्थ्यांनी भरले होते. मात्र, आता आरोग्य भरतीनंतर राज्य सरकारकडून पशुसंवर्धन विभागातील भरतीसुद्धा (Recruitment) रद्द करण्यात आली आहे. 

एकीकडे राज्य सरकारने अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना 75 हजार नोकऱ्या देणार असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे अशाप्रकारे जुन्या भरत्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकांमध्ये नाराजीची वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान, 2017 आणि 2019 ची भरती प्रकिया रद्द करुन पशुसंवर्धन विभाग नव्याने भरती प्रकिया राबवणार आहे. त्यामुळे ही भरती प्रकिया रद्द करण्यात आली आहे. पशुसंवर्धन आयुक्तालयांतर्गत सरळसेवा कोट्यातील गट क आणि ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत आधी 2017 आणि नंतर 2019 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. पशुवसंर्धन विभागातील 723 पदांसाठी ही जाहिरात काढण्यात आली होती. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. पैसे भरुन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जही भरले होते. मात्र आजपर्यंत परीक्षा झाली नाही. शासनाने ही भरतीही रद्द केली.

नवीन भरती प्रक्रिया सुरु झाल्यामुळे रखडलेले अनेक प्रश्न सुटतील 

खरंतर पशुसंवर्धन विभागातील परीक्षा रद्द केली नाही. जुनी भरती प्रक्रिया रद्द करुन नवीन भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती  महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामदास गाडे यांनी दिली. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षी फी भरली आहे. त्यांची फी देखील परत माघारी देण्यात येणार असल्याचे गाडे यांनी सांगितले. जुन्या भरती प्रक्रियेमध्ये काही त्रुटी होत्या. त्यामुळे जुनी प्रक्रिया रद्द होणार आहे. आता नवीन भरती प्रक्रिया सुरु झाल्यामुळे रखडलेले अनेक प्रश्न सुटतील असे गाडे म्हणाले. सध्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पशुसंवर्धन विभागातील यंत्रणेची गरज आहे. ही गरज पूर्ण होईल असेही गाडे यावेळी म्हणाले. 

तीन वर्षापासून भरती प्रक्रिया रद्द

गेल्या तीन वर्षापासून पशुसंवर्धन विभागातील भरती झालेली नाही. त्यामुळे सरळसेवेमध्ये भरणाऱ्या रिक्त जागांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आता वर्गवारीनुसार नव्याने जागा वाढवल्या जाणार आहेत. आता सर्व भरती प्रक्रिया नव्याने राबवली जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्याने दिली आहे. भरती प्रकिया जरी पुढे गेली असली तरी जागा वाढवल्या जातील. ज्या विद्यार्थ्यांची वयाची मर्यादा संपली आहे. त्यांच्याबाबत शासन विचार करेल अशी माहितीही पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. 

20 ते 30 टक्के जागा वाढण्याची शक्यता

दरम्यान, पशुसंवर्धन विभागातील भरतीच्या प्रक्रियेमध्ये काही ठिकाणी फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या सर्व गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे भरती प्रकिया आता नव्याने राबवली जाणार आहे. यावेळी जळपास 20 ते 30 टक्के जागा वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या: 

Maharashtra Government Jobs : 75 हजार पद भरतीतला मोठा अडथळा दूर, कोणत्या खात्यात किती जागा?

एबीपी माझाच्या मुंबई ब्युरो मध्ये गेल्या वर्षभरापासून मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी  ई टीव्ही भारत,लोकमत आणि मुंबई तरुण भारत या माध्यम समूहांमध्ये कार्यरत होते. सर्वसामान्य घडामोडींसह राजकीय बातम्याचं वार्तांकन ते करतात.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget