मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना सरकारला ऑक्सिजनसाठी धावाधाव करावी लागत आहे. पण ही धावाधाव आता थांबण्याची शक्यता आहे. कारण आता राज्यातील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून ऑक्सिजन तयार करता येतो का याची चाचपणी सुरू असून ती तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. राज्यातील हा प्रयोग जर यशस्वी झाला तर तो देशासमोर आदर्श ठरेल. 


काही वेळेस अडचणीत काही जगावेगळे मार्ग सापडतात. सध्या ॲक्सीजन पुरवठ्याच्या अभावी कोरोना बाधितांचे प्राण जात आहेत. अशा काळात आपल्या राज्यातल्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून ऑक्सिजन निर्मितीचा पर्याय समोर येवू लागला आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी ही माहिती एबीपी माझाला दिली आहे. गेल्या सहा दिवसापासून या संदर्भात अभ्यास सुरू आहे. 


आपण पाच औष्णिक वीज निर्मिती केंद्रामधून ऑक्सिजन जनरेट करू शकतो. त्या ठिकाणी ओझोनायझेशन प्लॅन्ट आहेत, कुलिंग टॅावर आहेत. तिथे शेवाळ तयार होवू नये यासाठी हे कुलिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. औष्णिक विद्युत केंद्रातील कुलिंग टॅावर मध्ये गरम पाण्याची वाफ वापरण्यात येते. ते रिसायकलिंग करण्यासाठी कुलिंग टॅावर असतात. तिथे शेवाळ तयार होवू नये यासाठी ही यंत्रणा आहे. 


हे कुठे आणि किती प्रमाणात शक्य आहे?
राज्यातल्या पाच औष्णिक वीज निर्मिती केंद्रात हे ऑक्सिजन प्लॅन्ट आहेत.


1) खापरखेडा नागपूर, तिथे दोन प्लॅन्ट आहेत. तिथे पहिल्या पॅन्टला 42 क्युबिक मीटर प्रती तास ( 1 क्यबिक मीटर बरोबर 1 हजार लिटर ) एवढी निर्मिती होवू शकते. हे प्लॅन्ट 24 तास चालू शकतात. 
2) खापरखेडा, दुसरे युनिट 72 क्युबिट मीटर प्रती तास एवढी क्षमता आहे. 
3) कोराडीच्या औष्णिक निर्मिती केंद्रात 390 क्युबिक मीटर प्रती तास
4) कोराडी इथला दुसरा प्लॅन्ट 50 क्युबिक मीटर प्रती तास
5) परळी 84 क्यबिक मिटर आणि दुसरा पण तेवढाच आणि तिसरा अंबाजोगाईला शिफ्ट ज्याची क्षमता 84 क्युबिक मिटर 
6) पारस अकोला पहिला 50 आणि दुसरा देखील 50 क्युबिक मीटर प्रती तास  एवढी क्षमता आहे. या सर्व ठिकाणी तीन ते चार तासात रिफिलिंगची क्षमता आहे. तिथे मनुष्यबळ आहे. बाकी तांत्रिक क्षमता आहे.  


पण सध्या या केंद्रातून अधिक प्रेशरनी रोज किती सिलेंडर भरले जावू शकतात यावर अभ्यास सूरू आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर महाराष्ट्राच्या ऑक्सिजन पुरवठ्यात मदत होवू शकते


कुलिंग टॉवर
याचा उपयोग अती उच्च तापमान व दाब असलेल्या वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करण्यासाठी होतो.


टर्बाईनवर फेकलेली अती उच्च तापमान व दाब असलेली वाफ पुढे वॉटर ट्रीटमेंट करून पुन्हा रिसायकल करून वापरात आणली जाते.
ही वाफ कुलिंग टॉवरच्या भिंतीवर तसेच पाईपलाईनवर शेवाळ व इतर प्रकारचे अनावश्यक पदार्थ तयार करण्याची शक्यता जास्त असते. ते तयार होऊ नये याकरता ऑक्सिजन (O2) चे रूपांतर ओझोन (O3) मध्ये करून त्याचा मारा कुलिंग टॉवरच्या भिंतीवर केल्याने ही शेवाळची वाढ थांबवता येते.


आज रोजी प्लॅन् मधील ऑक्सिजनचा वापर ओझोन तयार करण्यासाठी न करता त्याचे रूपांतर मेडिकल ऑक्सिजनसाठी करता येण्याबाबत सकारात्मक गोष्टी समोर येत आहेत. ओझोनचा वापर न करता क्लोरिनेशन करून देखील शेवाळची वाढ थांबवता येऊ शकते. त्यामुळे प्लॅन्ट प्रोसेसला हानी न होता ऑक्सिजनचा वापर सहज शक्य आहे.


राज्यातील काही औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती होऊ शकते का याची चाचपणी सुरू आहे. मात्र ती किती प्रमाणात होऊ शकते, किती वेळ होऊ शकते आणि ती सध्याच्या गरजेच्या तुलनेत किती होऊ शकते या सर्व बाबींवर टेक्निकल अभ्यास सुरू आहे. तज्ञ त्याचा आढावा घेत आहेत. तसेच यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. 


महत्वाच्या बातम्या :