1. कोरोना संकटातच बेळगावमध्ये लोकसभा, तर पंढरपूरमध्ये विधानसभा पोटनिवडणुकांसाठी आज मतदान, महाविकासआघाडी, भाजपची प्रतिष्ठा पणाला 


2. निर्बंधांच्या काळात सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कडक लॉकडाऊनचा इशारा


3. संचारबंदीच्या काळात नियमांचं पालन करा, कडक पावलं उचलण्याची वेळ येऊ देऊ नका, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचं नागरिकांना आवाहन 


4. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गैरफायदा घेतला आणि गर्दीचं चित्र कायम राहिलं तर, लॉकडाऊन लावू विजय वडेट्टीवार यांचा इशारा 


5. कोरोना पॉझिटिव्ह असूनही बिनदिक्कतपणे वावर, होम आयसोलेट असलेले रुग्णच बनत आहेत सुपर स्प्रेडर, प्रशासनाची नियंत्रण व्यवस्थाच गायब


6. राज्यातील सर्व आमदारांना मिळणाऱ्या 4 कोटींच्या विकासनिधीपैकी 1 कोटींचा निधी कोरोनासाठी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती 


7. प्लाझ्मा दान करणाऱ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून मिळणार प्रत्येकी 2 हजार रुपये, 


8. लस उत्पादनातील कच्च्या मालाच्या निर्यातीवरील निर्बंध उठवा, अदर पूनावाला यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे मागणी 


9. राज्यात रेमडेसिवीरचा पुरवठा 19-20 एप्रिलला सुरळीत होणार, अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांची माहिती  


10. पश्चिम बंगालमध्ये पाचव्या सत्रातील मतदानास सुरुवात, 45 जागांसाठी 342 मतदार निवडणुकीच्या रिंगणात