ब्रासिलीया : ब्राझीलमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून आता त्या देशाच्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. देशात कोरोनाच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा मोठा तुटवडा जाणवत आहे तसेच बेड्सही अपुरे पडत आहेत. या पार्श्वभूमीवर महिलांनी शक्य असल्यास आपली गर्भधारणा एक किंवा दोन वर्षासाठी पुढे ढकलावी असं आवाहन ब्राझील सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं केलं आहे. 


 






21.4 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात आतापर्यंत एक कोटी 37 लाखांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये तीन लाख 65 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा आता अमेरिका आणि भारताच्या नंतर जगात तिसरा क्रमांक लागतोय. भारताच्या तुलनेत ब्राझीलची मोठी लोकसंख्या कोरोनाला बळी पडली असून त्या देशाची अत्यंत वाईट अवस्था झाल्याचं दिसून येतंय. इतर देशांचा विचार करता ब्राझीलमध्ये कोरोनोमुळे मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. 


ब्राझीलमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला असून दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी भर पडत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे या देशात बेड्स आणि औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ब्राझीलने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मदतीची याचना केली आहे. कोरोनाचे संकट गडद आहे तोपर्यंत स्त्रियांनी आपली गर्भधारणा पुढे ढकलावी असं आवाहन ब्राझील सरकारने दिला आहे. 


एकूण लोकसंख्येचा विचार करता ब्राझीलची अवस्था भारतापेक्षा कितीतरी वाईट आहे. भारतातही दिवसेंदिवस रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असून शुक्रवारी एकाच दिवसात 2.34 लाख इतक्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. 


महत्वाच्या बातम्या :