एक्स्प्लोर

अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर

अनेक महाविद्यालयाच्या इमारती या क्वारंटाईन सेंटर म्हणूनही वापरल्या गेल्यात. त्यामुळे तिथे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बोलावणं हे त्यांच्या जिवाशी खेळण्यासारखं होईल, असं राज्य सरकारनं स्पष्ट करत परीक्षा यंदा न घेण्याच्या निर्णयाचं जोरदार समर्थन केलं आहे.

मुंबई : विद्यापिठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणं हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे त्या यंदा न घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा योग्यच असल्याचं प्रतिज्ञापत्र राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं हायकोर्टात सादर केलं आहे. राज्यभरातील पालिका प्रशासनांनी ठिकठीकाणी कंन्टेंमेंट झोन घोषित केले आहेत. त्याचबरोबर अनेक महाविद्यालयाच्या इमारती या क्वारंटाईन सेंटर म्हणूनही वापरल्या गेल्यात. त्यामुळे तिथे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बोलावणं हे त्यांच्या जिवाशी खेळण्यासारखं होईल, असं राज्य सरकारनं स्पष्ट करत परीक्षा यंदा न घेण्याच्या निर्णयाचं जोरदार समर्थन केलं आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाला म्हणजेच (यूजीसी) कडेच विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे राज्य सरकारला परीक्षा आणि मूल्यांकनबाबत कोणताही निर्णय घेण्याचा मुळात अधिकार नाही, असा दावा करत हायकोर्टात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर उत्तर देताना सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार केवळ युजीसी हेच विद्यापीठांवर नियमन करु शकते, राज्य सरकारला हा अधिकारच नाही. त्यामुळे या निर्णयाला कायदेशीर आधार नसल्यानं हा अध्यादेश रद्द करा, अशी प्रमुख मागणी याचिकेतून केलेली आहे.

राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने यंदाच्या परीक्षांबाबत 19 जून रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. यानुसार कोविड19 साथीमुळे यंदा व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. तसेच अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा या कालांतराने घेतल्या जातील. हा अध्यादेश रद्द करण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात पुण्यातील निवृत्त शिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अॅड. उदय वारुंजीकर यांच्यामार्फतही याचिका दाखल केली आहे.

राज्य सरकारने यंदा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची वर्गवारी केली आहे. जर कोरोनामुळे एका गटाची परीक्षा रद्द केली आहे तर दुसऱ्या गटाची परीक्षा ही कालांतराने कशी काय घेतली जाऊ शकते?, असा सवाल या याचिकेतून केली आहे. तसेच जर परीक्षेला हजर नाही झालात तर विद्यार्थ्यांना मागील परिक्षेतील गुणांचा आढावा घेऊन सरासरी मूल्यांकन दिलं जाईल, असा पर्यायही सरकारने दिला आहे. मात्र मूल्यमापन करण्याची ही पद्धती शिक्षणक्षेत्राला अनभिज्ञ आहे. त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थी आणि पालकांना संभ्रमित केले आहे, असा आरोपही याचिकादाराने केला आहे.

संबंधित बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अवकाळी पावसाचा धुमाकूळ! फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका, राज्यात कुठं कुठं पडतोय पाऊस?
अवकाळी पावसाचा धुमाकूळ! फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका, राज्यात कुठं कुठं पडतोय पाऊस?
पोलीस मुख्यालयामध्येच पोलीस शिपायाने संपवलं जीवन, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर 
पोलीस मुख्यालयामध्येच पोलीस शिपायाने संपवलं जीवन, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर 
धक्कादायक! अल्पवयीन मुलीचं मध्य प्रदेशात अपहरण करुन अत्याचार, मुस्लिम तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
धक्कादायक! अल्पवयीन मुलीचं मध्य प्रदेशात अपहरण करुन अत्याचार, मुस्लिम तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2026 | बुधवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2026 | बुधवार

व्हिडीओ

Phaltan SSC Paper Check News : दहावीचे पेपर सहावीच्या मुलींनी तपासले, तक्रार देणाऱ्यालाच आरोपी ठरवलं
Pune IMD On Rain Alert : पुढील दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता
Captain Kharat Bhondu Baba : नाशिक- भोंदूबाबाचं धक्कादायक कांड, महिलेशी गैरवर्तन, व्हिडीओ समोर
Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
Eknath Shinde Meet PM Modi : एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले, काय ठरलं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil: सांगली झेडपीत सत्ता स्थापनेत माजी खासदार संजयकाका पाटलांची आम्हाला छुपी मदत; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
सांगली झेडपीत सत्ता स्थापनेत माजी खासदार संजयकाका पाटलांची आम्हाला छुपी मदत; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, लैंगिक शोषणाचे आरोप; त्याच भोंदूबाबा अशोक खरातची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांकडून पाद्यपूजा; आता अंजली दमानियांचा नवा बाॅम्ब
तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, लैंगिक शोषणाचे आरोप; त्याच भोंदूबाबा अशोक खरातची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांकडून पाद्यपूजा; आता अंजली दमानियांचा नवा बाॅम्ब
Sangli ZP Election: सांगलीत महाविकास आघाडीकडून महायुतीचा करेक्ट कार्यक्रम! झेडपीच्या अध्यक्षपदी शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील
सांगलीत महाविकास आघाडीकडून महायुतीचा करेक्ट कार्यक्रम! झेडपीच्या अध्यक्षपदी शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील
Nilesh Lanke On Radhakrishna Vikhe Patil: निलेश लंकेंचा राधाकृष्ण विखे-पाटलांच्या जावई अन् मुलीवर घोटाळ्याचा गंभीर आरोप, 100 कोटी अन् दुबई कनेक्शन, ZR 2 Bio Energy कंपनी रडारवर
निलेश लंकेंचा राधाकृष्ण विखे-पाटलांच्या जावई अन् मुलीवर घोटाळ्याचा गंभीर आरोप, 100 कोटी अन् दुबई कनेक्शन, ZR 2 Bio Energy कंपनी रडारवर
Weather Update: पुढील दोन दिवस राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यावर अवकाळीचे सावट, हवामान विभागाचा अंदाज, मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
पुढील दोन दिवस राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यावर अवकाळीचे सावट, हवामान विभागाचा अंदाज, मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Joe Kent: राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्रप्रमुखांनी तडकाफडकी राजीनामा देताच अमेरिकन लष्करात बंडाळीची चर्चा, पण राजीनाम्यात 'स्पेशल' उल्लेख केलेली इस्त्रायली लाॅबी नेमकी कोण?
राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्रप्रमुखांनी तडकाफडकी राजीनामा देताच अमेरिकन लष्करात बंडाळीची चर्चा, पण राजीनाम्यात 'स्पेशल' उल्लेख केलेली इस्त्रायली लाॅबी नेमकी कोण?
Shivsena Operation Tiger: ऑपरेशन टायगरच्या हालचाली उद्धव ठाकरेंना थांगपत्ता लागण्याआधीच खासदारांशी बोलणी आटोपली, आता एकनाथ शिंदे D-day ला धमाका करणार?
ऑपरेशन टायगरच्या हालचाली उद्धव ठाकरेंना थांगपत्ता लागण्याआधीच खासदारांशी बोलणी आटोपली, आता एकनाथ शिंदे D-day ला धमाका करणार?
वाहनांच्या LPG दरांचा पुन्हा भडका! युद्धजन्य परिस्थितीचे कारण देत दोन आठवड्यांत ‘इतकी’ वाढ, नागपुरात पंपाबाहेर फलक लावले
वाहनांच्या LPG दरांचा पुन्हा भडका! युद्धजन्य परिस्थितीचे कारण देत दोन आठवड्यांत ‘इतकी’ वाढ, नागपुरात पंपाबाहेर फलक लावले
Embed widget