एक्स्प्लोर

ST Workers Strike : संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार? व्हायरल पत्रावर एसटी महामंडाळाने म्हटले...

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे पत्र व्हायरल होत आहे. या पत्रावर एसटी महामंडळाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ST Workers Strike : एसटी संपातून माघार घेत पुन्हा कामावर रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे पत्र व्हायरल झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. या पत्रावर एसटी महामंडळाने या पत्राबाबत खुलासा केला असून हे पत्र बोगस असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी एसटी महामंडळाकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

वेतनवाढ, एसटी महामंडळाचे विलीनीकरण आदींसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. सरकारने विलीनीकरण वगळता वेतनवाढीसह इतर मागण्या मान्य केल्या होत्या. त्यानंतर कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रूजू होण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अनेक कर्मचारी कामावर पुन्हा परतले होते. या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, व्हायरल होणाऱ्या पत्रामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. 

व्हायरल होणाऱ्या पत्रात काय ?

एसटी महामंडळाचे कर्मचारी वर्गाचे महाव्यवस्थापक माधव काळे यांच्या सहीने एक परिपत्रक व्हायरल होत आहे. या पत्रानुसार, अधिकाधिक एसटी कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाल्यानंतर आणि एसटी वाहतूक सुरळीतपणे सुरू झाल्यानंतर 29 ऑक्टोबर 2021 ते 10 मार्च 2022 पर्यंत संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांवर पुढील कार्यवाही करण्याचे आदेश एसटी महामंडळाच्या विभागांना देण्यात आले होते. 

एसटी महामंडळाने काय म्हटले?

एसटी महामंडळाने व्हायरल होणाऱ्या पत्रावर खुलासा केला आहे. हे परिपत्रक पूर्णत: खोटे व बनावट असून कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा रूजू होण्यापासून अटकाव करण्यासाठी हे बनावट पत्र व्हायरल केले असल्याचे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी म्हटले. एसटी महामंडळाने या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  येत्या 10 मार्च 2022 पर्यंत कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget