एक्स्प्लोर

वीरपत्नींना महाराष्ट्र दिनापासून मोफत एसटी प्रवास

काही वीरपत्नींनी एसटीच्या मोफत पासची योजना स्वतःची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन स्वतःहून नाकारली आहे.

धुळे : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेतंर्गत भारतीय सैन्यातील, सुरक्षा दलातील कर्तव्यावर वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवानांच्या वीरपत्नीला एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून आजीवन मोफत प्रवास सवलत मिळणार आहे. या सवलत योजनेचा शुभारंभ महाराष्ट्र दिनी (1 मे 2018) प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होणाऱ्या शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते सवलत कार्ड देऊन होणार आहे. वीरपत्नींना देण्यात येणाऱ्या कार्डवर एका बाजूला शहीद झालेल्या जवानाचा फोटो, नाव, हुद्दा, पत्ता आहे, दुसऱ्या बाजूला वीरपत्नीचा फोटो, सवलत पास क्रमांक, नाव, पत्ता, रक्तगटाचा उल्लेख असेल. राज्यातील 517 वीरपत्नींना उद्या हे सवलत कार्ड देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी वीरपत्नी आणि त्यांच्या कुटुंबियांना उपस्थित राहता यावं यासाठी एसटी प्रशासनाने विशेष सोय देखील केली असल्याचं एसटीच्या सूत्रांनी सांगितलं. एसटी प्रशासनाच्या उपलब्ध माहितीच्या आधारे काही वीरपत्नींनी ही सवलत योजना स्वतःची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन स्वतःहून नाकारली आहे. शहीद जवानांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी एसटी महामंडळ या शहीद सन्मान योजनेची सुरुवात करुन थांबलं नाही, तर यापुढे शहीद जवानाच्या पाल्याला अथवा वारसाला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार थेट एसटीच्या नोकरीत सामावून घेतलं जाणार आहे, अशी माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली. शहीद जवानाच्या पाल्याला अथवा वारसाला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार थेट एसटीच्या नोकरीत सामावून घेणारं एसटी महामंडळ हे देशातील एकमेव महामंडळ आहे. एसटीचा हा आदर्श इतर महामंडळांनी देखील अंमलात आणून शहीद जवानांच्या प्रती आदर व्यक्त करावा असा सूर आता सर्व स्थरातून उमटत आहे. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटीने प्रत्येक प्रवाशाने प्रवास केल्यास एसटीच्या या योजनांसाठी आपली देखील खारीच्या वाट्याची मदतच होईल. ही सुद्धा एक देशसेवाच आहे. ही भावना प्रत्येक प्रवाशाच्या मनात निर्माण होऊन खाजगी वाहतुकीपेक्षा एसटीने प्रवास केल्यास आपण दिलेल्या पैशाचा योग्य विनीयोग झाला. याचं आत्मिक समाधान प्रत्येक प्रवाशाला  होईल, असा विश्वास एसटीतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

जरांगे पाटलांच्या ताफ्यातील कारला अपघात, कार्यकर्त्याला डिफेंडरमधून रुग्णालयात नेलं; प्रकृती स्थिर
जरांगे पाटलांच्या ताफ्यातील कारला अपघात, कार्यकर्त्याला डिफेंडरमधून रुग्णालयात नेलं; प्रकृती स्थिर
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Embed widget