एक्स्प्लोर

एका निर्णयाने एसटी महामंडळाचे तब्बल 13 कोटी वाचणार!

एसटी महामंडळाची तिकीट विक्रीतून दररोज जमा होणारी रोख रक्कम स्थानिक पातळीवरील राष्ट्रीयकृत बँक स्वतः आगारातून घेऊन जाणार आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या दरवर्षी रोकड हाताळणीसाठी खर्च होणाऱ्या सुमारे १३ कोटी रुपयांची बचत होणार आहे.

मुंबई : एसटी महामंडळाची तिकीट विक्रीतून दररोज जमा होणारी रोख रक्कम स्थानिक पातळीवरील राष्ट्रीयकृत बँक स्वतः आगारातून घेऊन जाणार आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या दरवर्षी रोकड हाताळणीसाठी खर्च होणाऱ्या सुमारे १३ कोटी रुपयांची बचत होणार आहे. काही महिन्यांपूर्वी सोलापूर आगारात १५ लाख रुपयांची रोख रक्कम बँकेत भरणा करण्यासाठी घेऊन जात असताना चोरट्यांनी चोरुन नेण्याचा प्रकार घडला होता. या घटनेची मंत्री दिवाकर रावते यांनी गंभीर दखल घेऊन रोख रक्कम भरण्याची जबाबदारी संबंधित बँकेवर सोपविण्याबाबत एसटी प्रशासनाला सूचना केली होती. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या २८४ व्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मंत्री रावते म्हणाले की, ‘एसटी महामंडळाच्या २५० आगारात तिकीट विक्रीतून गोळा झालेली रोख रक्कम दररोज बँकेत महामंडळामार्फत जमा केली जाते. दरदिवशी सुमारे १५ कोटी रुपये रोख स्वरुपात विविध आगारात जमा होतात. ही रक्कम एसटीच्या बसेसद्वारे जवळच्या स्थानिक राष्ट्रीयकृत बँकेत भरली जाते. मात्र प्रत्येक आगारातून मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या रोख रकमेची पुरेशी सुरक्षा व्यवस्था एसटीकडे उपलब्ध नसल्याने तसेच मागणी करूनही अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीस प्रशासनाकडून असमर्थता दाखवली जात असल्याने या रकमेची चोरी होणे, दरोडा पडणे अशा घटना घडत असतात. हे सर्व थांबविण्यासाठी बँकेनेच आगारात येऊन रक्कम घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार भारतीय स्टेट बँकेने राज्यातील २५० आगार क्षेत्रातील रोख रक्कम घेऊन जाण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे ही रक्कम बँकेत जमा करणे, त्यासाठी लागणारी सुरक्षा व्यवस्था, बसची व्यवस्था या सर्वावरील खर्चात बचत झाल्याने महामंडळाचे दरवर्षी तब्बल १३ कोटी रुपये वाचणार आहेत.’ असे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
Maharashtra IAS Transfer : राज्य प्रशासनात मोठे फेरबदल! डॉ. माधवी खोडे-चवरे यांच्यासह 4 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा संपूर्ण यादी
राज्य प्रशासनात मोठे फेरबदल! डॉ. माधवी खोडे-चवरे यांच्यासह 4 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा संपूर्ण यादी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जून 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report
INDIA Alliance Meeting : पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करा; ठाकरेंची मागणी | Special Report
Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Financial Freedom : आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
Gold vs US Dollar : आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
Share Market : बाजारात व्ही-शेप रिकव्हरी! ओला इलेक्ट्रिकसह 'हे' 3 शेअर्स ब्रेकआउटमुळे चर्चेत
बाजारात व्ही-शेप रिकव्हरी! ओला इलेक्ट्रिकसह 'हे' 3 शेअर्स ब्रेकआउटमुळे चर्चेत
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
IND A vs SL A Highlights : टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला 
टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला 
Embed widget