एक्स्प्लोर

वशिलेबाजी चालू देणार नाही, एसटी महामंडळाची उमेदवारांना ग्वाही

कोणत्याही पदाच्या भरती प्रक्रियेत अध्यक्षासहित कोणाचाही वशिला चालणार नाही, तसंच इतर प्रलोभनं किंवा कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असं एसटी महामंडळाने स्पष्ट केलं आहे.

मुंबई : एसटी महामंडळाकडून सुरु असलेल्या चालक आणि वाहकपदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवार आणि त्यांच्या नातेवाईकांनी प्रलोभनाला बळी न पडता निर्भीडपणे भरती प्रक्रियेला सामोरं जावं, असं आवाहन एसटी महामंडळातर्फे लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना करण्यात आलं आहे. गेल्या चार वर्षांमध्ये एसटी महामंडळामार्फत अतिशय पारदर्शक पद्धतीने विविध पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. स्वतः महामंडळाचे अध्यक्ष प्रत्येक भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे कोणत्याही पदाच्या भरती प्रक्रियेत अध्यक्षासहित कोणाचाही वशिला चालणार नाही, तसंच इतर प्रलोभनं किंवा कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असं एसटी महामंडळाने स्पष्ट केलं आहे. उमेदवारांना भरती प्रक्रियेबद्दल काही शंका किंवा तक्रार असल्यास आपल्याकडील सबळ पुराव्याच्या आधारे 1800-1218414 या निःशुल्क दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार नोंद करावी, असं आवाहन एस.टी महामंडळातर्फे करण्यात येत आहे. 24 फेब्रुवारी 2019 रोजी राज्याच्या 21 जिल्ह्यांमध्ये सुमारे 8 हजार 22 चालक आणि वाहकपदांसाठी लेखी परीक्षा पार पडली. त्यातील उत्तीर्ण उमेदवारांची कागदपत्रं पडताळणी आणि शारीरिक क्षमता चाचणी प्रक्रिया सुरु असून यापैकी  पात्र उमेदवारांना संगणकीय चालन परीक्षेसाठी बोलवण्यात येणार आहे. लेखी आणि संगणकीय चालन परीक्षा यांच्या संयुक्त गुणतालिकेनुसार अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मात्र कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक चाचणीत अपात्र ठरलेल्या उमेदवारांना काही जणांकडून नियमबाह्य पद्धतीने काम करुन अंतिम निवड यादीत नाव समाविष्ट करण्याचं आमिष संबंधित 'एजंट'कडून दाखवण्यात येत असल्याच्या तक्रारी एसटी महामंडळाच्या अध्यक्षांना फोनवरुन किंवा प्रत्यक्ष भेटून काही उमेदवार आणि त्यांच्या नातेवाईकांनी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने अशा तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. सध्या सुरु असलेल्या चालक आणि वाहकपदाच्या भरती प्रक्रियेत नियमानुसार कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक पात्रतेची चाचणी पूर्ण करण्यात येत असून कोणत्याही वशिला किंवा अवैध हस्तक्षेपाने उमेदवाराला भरती केले जाणार नाही. तसेच 17 ते 19 मे रोजी विविध वर्ग 1 आणि 2 च्या अधिकारी पदासाठी होणाऱ्या लेखी परीक्षेबाबत देखील उमेदवारांनी वशिलेबाजी, आमिष किंवा प्रलोभनाला बळी पडू नये, असं आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका

Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Embed widget