एक्स्प्लोर

दहावीच्या गुणपत्रकावरुन 'नापास' शेरा हद्दपार!

मुंबईः दहावीच्या गुणपत्रिकेवरील ‘नापास’ किंवा अनुत्तीर्ण हा शेरा आता कायमचा पुसला जाणार आहे. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर ‘कौशल्य विकास अभ्यासक्रमांसाठी 'पात्र’ असा शेरा देण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.   जुलैमध्ये झालेल्या फेर परीक्षेच्या गुणपत्रकांवर हे नवे शेरे देण्यात येणार आहेत. या परीक्षेचा निकाल मंगळवारी संकेतस्थळावर जाहीर झाला असून उत्तीर्ण झालेले आणि एटीकेटीची सवलत घेऊन अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 18 हजार आहे.  39 हजार 994 विद्यार्थी या परीक्षेत सर्व विषयांत उत्तीर्ण झाले आहेत.   काय आहे नवीन नियम?   दहावीच्या गुणपत्रकावरून यापुढे ‘नापास’, ‘अनुत्तीर्ण’ किंवा ‘फेल’ हे शब्द कायमचे हद्दपार करण्यात आले आहेत. नव्या शेऱ्यांनुसार उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘उत्तीर्ण’ असा शेरा येणार आहे. एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर एटीकेटी सवलतीसह अकरावी प्रवेशास पात्र असा शेरा येणार आहे.   नियमित परीक्षेत म्हणजे फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदाच दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थी दोन पेक्षा अधिक विषयांत अनुत्तीर्ण झाले असतील तर त्यांच्या गुणपत्रकावर ‘फेर परीक्षेसाठी पात्र’ असा शेरा येणार आहे. फेर परीक्षेत तीन पेक्षा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर ‘फक्त कौशल्यविकास अभ्यासक्रमासाठी पात्र’ असा शेरा येणार आहे.   काय होईल फायदा?   या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळू शकेल, मात्र अकरावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ते पात्र ठरणार नाहीत. यंदा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेर परीक्षा 18 जुलै ते 3 ऑगस्ट या दरम्यान झाली. या परीक्षेसाठी राज्यातून 1 लाख 42 हजार 968 विद्यार्थी बसले होते. त्यातील 39 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 27.97 एवढी आहे.   या परीक्षेत 78 हजार 153 विद्यार्थ्यांना एटीकेटीची सवलत मिळाली. शासनाच्या या नियमामुळे 1 लाख 18 हजार 147 विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. तीनपेक्षा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाल्यामुळे 14 हजार 332 विद्यार्थी हे फक्त कौशल्य विकास अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेत 14 विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी मिळाली आहे.   विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर नापास किंवा अनुत्तीर्ण असे लिहिले जाणार नाही. मात्र, त्यामुळे ज्या ठिकाणी दहावी उत्तीर्ण अशी पात्रता असेल तेथे गोंधळ होऊ शकतो. त्या पाश्र्वभूमीवर एटीकेटी मिळालेल्या किंवा कौशल्य विकासासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर नापास असे लिहिले जाणार नसले तरीही या दोन शेऱ्यांचा अर्थ नापास असाच गृहीत धरण्यात येईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला
Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला
Sharad Pawar Letter to Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, नेमकं काय-काय म्हणाले?
'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, नेमकं काय-काय म्हणाले?
Maharashtra Weather Update : पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
Maharashtra Weather Updates: मराठवाड्यात दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर पावसाच्या हलक्या सरी; परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव आणि जालनामध्ये मान्सूनची हजेरी
मराठवाड्यात दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर पावसाच्या हलक्या सरी; परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव आणि जालनामध्ये मान्सूनची हजेरी

व्हिडीओ

Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report
Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Railway Mega Block: गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Maharashtra Weather Update : पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
SSC And HSC Board Exam 2027: राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Mumbai Crime News: मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
Embed widget