एक्स्प्लोर
सोलापुरात एटीएमच्या रांगेत भरधाव कार घुसली
सोलापूर : सोलापुरात एटीएमच्या रांगेत भरधाव कार घुसली. या कारने रांगेतील दहा जणंना उडवलं. विजापूर रोडवरील आतारनगरमध्ये ही घटना घडली.
पैसे काढण्यासाठी इंडियन बँकेच्या एटीएमबाहेर मोठी रांग लागली होती. परंतु मद्यप्राशन केलेल्या कार चालकांचं नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट गर्दीत घुसली.
यानंतर लोकांनी कार चालकाची यथेच्छ धुलाई करुन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. विजापूर रोड पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.
दरम्यान या थरारक घटनेत दहा जण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement