एक्स्प्लोर

अॅप्रेंटिस उमेदवारांसाठी वेगळी परीक्षा घेणार

अॅप्रेंटिस उमेदवारांसाठी वेगळी परीक्षा घेण्यात येणार आहे, असं रेल्वे बोर्डाने म्हटलं आहे.

मुंबई: रेल्वेच्या अॅप्रेंटिस उमेदरावांनी मुंबईत रेल्वे रोखल्यानंतर रेल्वेकडूनही आता त्याची दखल घेण्यात आली आहे. अॅप्रेंटिस उमेदवारांसाठी वेगळी परीक्षा घेण्यात येणार आहे , असं रेल्वे बोर्डाने म्हटलं आहे. अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के कोटा दिला आहे तो रद्द करा, रेल्वे जीएम कोट्यातून भरती होत होती तशी सुरु करा, रेल्वेत अडीच लाख जागा रिक्त असताना जागा भरल्या जात नाहीत त्या भरल्या जाव्यात, अशा प्रमुख मागण्या या प्रशिक्षणार्थींच्या आहेत. त्यासाठी सकाळी 7 पासून या उमेदवारांनी मुंबईच्या रेल्वेमार्गाची नाकेबंदी केली आहे. त्यानंतर आता रेल्वेने या आंदोलकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेचं स्पष्टीकरण अॅप्रेंटिस अक्टनुसार, अॅप्रेंटिस उमेदवारांना नोकरी देण्याचा कोणताही नियम नाही. अशा उमेदवारांना ठराविक काळात केवळ प्रशिक्षण दिलं जातं. त्यांचं कौशल्यविकास आणि कामाचा अनुभव हा त्यामागचा हेतू असतो. तरीही रेल्वे मंत्रालयाने 20 टक्के जागा या थेट अॅप्रेंटिसमधून भरण्याचा निर्णय घेतला. याबाबतची अधिसूचनाही जारी झाली असून, अर्ज करण्यासाठी 31 मार्च 2018 ही तारीख देण्यात आली आहे. अॅप्रेंटिस उमेदवार या अधिसूचनेनुसार अर्ज करु शकतात. त्यासाठी लवकरच विशेष/वेगळी परीक्षा घेऊ. ज्यांनी अॅप्रेंटिसशिप केली आहे, रेल्वे वर्कशॉपचं प्रशिक्षण घेतलं आहे, त्यांच्यासाठी ही परीक्षा असेल. अॅप्रेंटिस उमेदवारांचं आंदोलन ल्वेभरतीतील गोंधळाविरोधात अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत, मध्य रेल्वे ठप्प केली आहे. पिक अवर्सलाच म्हणजे सकाळी कामावर जाण्याच्या वेळेलाच, अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी अचानक रेल्वे बंद केल्याने, मुंबईकरांचं तुफान हाल होत आहे. विद्यार्थ्यांनी माटुंगा ते दादर दरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडला आहे. त्यामुळे लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या एक्स्प्रेसही रखडल्या आहेत. अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के कोटा दिला आहे तो रद्द करा, रेल्वे जीएम कोट्यातून भरती होत होती तशी सुरु करा, रेल्वेत अडीच लाख जागा रिक्त असताना जागा भरल्या जात नाहीत त्या भरल्या जाव्यात, अशा प्रमुख मागण्या या प्रशिक्षणार्थींच्या आहेत. अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांनी अनेक वर्षे काम करुनही जागा न भरल्याने हा पवित्रा घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे देशभरातील विद्यार्थी आज मुंबईत आले आहेत. त्यांनी सकाळी सकाळीच रेल्वे बंद पाडल्या. 20 टक्के कोटा रद्द करण्याची मागणी पूर्वी रेल्वे अप्रेंटिसना थेट रेल्वेत सामावून घेतलं जायचं, पण आता त्यासाठी 20 टक्के इतका कोटा ठरवला गेलाय, शिवाय एक लेखी परीक्षाही द्यावी लागते. त्यामुळे रेल्वेतल्या संधी कमी झाल्याचा युवकांचा आरोप आहे. मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचाही इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. यामध्ये अनेक मराठी तरुणांचाही समावेश आहे. संबंधित बातम्या LIVE लोकल ठप्प: अॅप्रेंटिस उमेदवारांची वेगळी परीक्षा घेणार

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
Sunetra Pawar and Ajit Pawar : 'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
Rahul Gandhi PM Modi house: पंतप्रधान मोदींच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी राहुल गांधींनी कसा तयार केला सिक्रेट प्लॅन? वाचा इनसाईड स्टोरी
पंतप्रधान मोदींच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी राहुल गांधींनी कसा तयार केला सिक्रेट प्लॅन? वाचा इनसाईड स्टोरी

व्हिडीओ

Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar and Ajit Pawar : 'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
Uddhav Thackeray Abhijeet Dipke CJP Protest Delhi Jantar Mantar: जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
Ajit Pawar and Sunetra Pawar: रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्...
रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्...
Rahul Gandhi: एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
Ajit Pawar Birth Anniversary : दादा... काळीज पिळवटून निघतंय, सगळंच पोरकं झालंय; अजित दादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट, स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन
दादा... काळीज पिळवटून निघतंय, सगळंच पोरकं झालंय; अजित दादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट, स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
Uddhav Thackeray Abhijeet Dipke CJP Protest Delhi Jantar Mantar: मिठी मारली, पाठ थोपटली...; अभिजीत दीपके हात पकडून उद्धव ठाकरेंना मंचावर घेऊन आले, Photo
मिठी मारली, पाठ थोपटली...; अभिजीत दीपके हात पकडून उद्धव ठाकरेंना मंचावर घेऊन आले, Photos
Embed widget