एक्स्प्लोर

ओबीसीमधील काही मंडळी आरक्षणाच्या विरोधात : मराठा क्रांती ठोक मोर्चा

आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाने बलिदान दिले असून जर असा प्रयत्न झाल्यास भविष्यात महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण होईल त्याला हीच राजकीय मंडळी जबाबदार असतील, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

ठाणे : मराठा समाजाला मिळालेले आरक्षण हे कोणत्याही जाती धर्माच्या आरक्षणाला धक्का न लावता मिळालेलं आहे. ओबीसीमधील 361 जातींचा देखील या आरक्षणाला पाठिंबा आहे. असे असताना काही राजकीय मंडळी या आरक्षणाला विरोध करण्यासाठी मूठभर लोकांना हाताशी धरून आरक्षणाच्या विरोधात याचिका टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केला आहे. आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाने बलिदान दिले असून जर असा प्रयत्न झाल्यास भविष्यात महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण होईल त्याला हीच राजकीय मंडळी जबाबदार असतील, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. प्रदीर्घ लढ्यानंतर विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये मराठा आरक्षणाच्या विधेयकाला मंजूरी मिळाली असल्याने मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. हे विधेयक सभागृहात मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्रात जल्लोष देखील करण्यात आला. सरकारने दिलेले आरक्षण हे टिकणारे आरक्षण असल्याचा विश्वास देखील मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र या आरक्षणाच्या विरोधात काही राजकीय मंडळी मूठभर लोकांना हाताशी धरून याचिका टाकण्याच्या तयारीत असल्याचा संशय पदाधिकाऱ्यांना आहे. यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी रविवारी ठाण्यात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील यांनी आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी या समाजाने 25 ते 30 वर्षांचा प्रदीर्घ लढा दिला. साडेचौदा हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केली आहे. 42 लोकांनी बलिदान दिले आहे तर आतापर्यंत 59 मोर्चे तर दोन ठोक मोर्चे काढण्यात आले आहेत. कोणत्याही जातीच्या आणि धर्माच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण मिळावे अशी आमची सुरुवातीपासूनच मागणी आहे.  सरकारने देखील त्याच पद्धतीने आरक्षण दिले असताना मात्र ओबीसीमधील काही ठराविक मंडळी या आरक्षणाला जाणीवपूर्वक विरोध करत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. यामुळे जाती-जातीमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. जर आरक्षणाबाबत काही आक्षेप असतील तर या घटकांनी सरकारशी चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.   सामाजिक बांधिलकी समजून या आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करून नये असे देखील आवाहन त्यांनी केले आहे. हे आरक्षण टिकावे यासाठी बार कौन्सिलला देखील पत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र जर असे प्रकार जाणूनबुजून केल्यास महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण होईल त्याला हीच मंडळी जबाबदार असतील असा इशारा देखील त्यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत

Embed widget