एक्स्प्लोर
सोलापुरात बस उलटून तीन चिमुरड्यांचा मृत्यू
ट्रॅव्हल्स चालक दारुच्या नशेत होता, त्यामुळेच अपघात घडला, असा दावा अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांनी केला आहे.

पंढरपूर : सोलापुरात बार्शी-कुर्डुवाडी मार्गावर बस उलटून झालेल्या अपघातात तीन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 15 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
नांदेडमधील मुखेडहून मुंबईच्या दिशेने जाताना बार्शीतील वांगरवाडी शिवारात हा अपघात घडला. अंदोरा एक्स्प्रेस (MH04-GP-5151)ही लक्झरी बस रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास उलटली.
अपघातात लातूरमधील अहमदपूरमध्ये राहणारी दीड वर्षांची आर्वी मोहन देवकते, मुंबईतील तीन वर्षांची फैज इस्माईल पठाण आणि नांदेडमधील कंदार तालुक्यात राहणाऱ्या बारा वर्षांच्या धनश्री ज्ञानेश्वर मुकनरचा मृत्यू झाला.
अपघातात पंधराहून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. कुणाला पाय, तर कुणाला हात गमवावा लागला. बार्शीतील रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत.
ट्रॅव्हल्स चालक दारुच्या नशेत होता, त्यामुळेच अपघात घडला, असा दावा अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
करमणूक
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
