एक्स्प्लोर

सोलापूर दरोडेखोर एन्काउन्टर प्रकरणाला नवं वळण

मयत विनायक काळे यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसताना पोलिसांनी त्याचा थेट एन्काऊंटर केला. एका प्रकरणात पोलीस विनायककडे पैशाची मागणी करत होते, असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

सोलापूर : सोलापूर पोलिसांनी दरोडेखोर म्हणून गोळी घालून एन्काऊंटर केल्याच्या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. पोलिसांनी बनाव रचून हत्या केल्याचा आरोप मृत विनायक काळेच्या नातेवाईकांनी केला आहे. जिल्हा रुग्णालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विनायकचे नातेवाईक आंदोलनाला बसणार आहेत.

नातेवाईकांचा आरोप

मयत विनायक काळे यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसताना पोलिसांनी त्याचा थेट एन्काऊंटर केला. एका प्रकरणात पोलीस विनायककडे पैशाची मागणी करत होते, असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. विनायकच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याचाही आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी नातेवाईकांनी केली असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

मयत विनायक हा बारावी पास होता. पोलीस दलात भरती होण्यासाठी विनायक रोज सराव करत होता. विनायक एक बहीण इंजिनिअर तर एक पदवीधर असून एमपीएससीची तयारी करत आहे. विनायकच्या अचानक मृत्यूने त्याच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे.

पोलिसांचं स्पष्टीकरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विनायकवर याआधी तीन गुन्हे दाखल आहेत. या तीन गुन्ह्यांपैकी एक गुन्हा दरोड्याचा आहे. गेल्या काही दिवसांपासून डिझेल चोरी करणारी टोळी परिसरात कार्यरत होती. त्या टोळीत विनायक सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. तर राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या निकषाप्रमाणे या प्रकरणाची चौकशी होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये सोलापूरच्या उळे गावाजवळ चकमक झाली. या चकमकीत विनायक काळे हा दरोडेखोर ठार झाला आहे, तर तीन पोलीस जखमी झाले आहेत.

शनिवारी पहाटेच्या सुमारास उळे गावाजवळ गस्त घालताना तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांना पाच ते सहा दरोडेखोर दिसले असता पोलिसांनी त्यांना हटकले. त्यापैकी विनायकला पकडून गाडीत घालत असताना त्याच्यासह इतर सहकाऱ्यांनी हातातील तलवारीने पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या हातावर आणि मांडीवर तलवारीने हल्ला केला. तसेच दगडफेकही केली. या हल्ल्यात विजय पाटील गंभीर जखमी झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! बुलढाण्यात शेतातील गोठ्यात गर्भलिंग निदान चाचणी, बोगस डॉक्टरसह तिघांना रंगेहात पकडलं 
धक्कादायक! बुलढाण्यात शेतातील गोठ्यात गर्भलिंग निदान चाचणी, बोगस डॉक्टरसह तिघांना रंगेहात पकडलं 
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
कुंभमेळ्याइतकाच 30 हजार कोटींचा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाही द्या, डॉ. प्रवीण तोगडियांची मागणी, तिजोरी खाली करण्याचा सरकारला सल्ला
कुंभमेळ्याइतकाच 30 हजार कोटींचा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाही द्या, डॉ. प्रवीण तोगडियांची मागणी, तिजोरी खाली करण्याचा सरकारला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
PMC Recruitment Scam : पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल
पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल
US Report China Pakistan : अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
ह्रदयद्रावक... ऊसतोडणीच्या कामादरम्यान विश्रांती जीवावर बेतली; हार्वेस्टिंग मशिनच्या वाहनाखाली दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... ऊसतोडणीच्या कामादरम्यान विश्रांती जीवावर बेतली; हार्वेस्टिंग मशिनच्या वाहनाखाली दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
Gokul : गोकुळच्या दूध दरात 6 रुपयांची वाढ, प्रशासक काळातील तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी दरवाढ, शेतकऱ्यांची मात्र तीन रुपयांवर बोळवण
गोकुळच्या दूध दरात 6 रुपयांची वाढ, प्रशासक काळातील तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी दरवाढ, शेतकऱ्यांची मात्र तीन रुपयांवर बोळवण
Kolhapur Crime News: शाळेतील पुस्तक घेऊन बोलावलं, डोळ्यांवर पट्टी बांधून मिठाईचं आमिष दाखवलं; नराधम चुलत्याचा अल्पवयीन पुतणीवर अत्याचार
शाळेतील पुस्तक घेऊन बोलावलं, डोळ्यांवर पट्टी बांधून मिठाईचं आमिष दाखवलं; नराधम चुलत्याचा अल्पवयीन पुतणीवर अत्याचार
Embed widget