एक्स्प्लोर
विजय चौकात मुख्यमंत्र्यांच्या सभेला परवानगी नाही!

सोलापूर : सोलापूर पोलिसांनी भाजपला धक्का दिला आहे. कारण पोलिसांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेलाच परवानगी नाकारली आहे.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांची बाळीवेस इथल्या विजय चौकात 14 फेब्रुवारीला होणारी सभा रद्द झाली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव सभेला परवानगी नाकारल्याचं पोलिसांनी सांगितलं.
विजय चौक भाजपचा पारंपरिक जाहीर सभेचा चौक म्हणून ओळखला जातो. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, दिवंगत नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, लालकृष्ण अडवाणी या दिग्गजांची सभा झालेलं ठिकाण, म्हणून विजय चौक ओळखला जातो.
मात्र इथेच सभेला परवानगी नाकारल्याने भाजपची गोची झाली आहे.
सुरक्षा आणि रहदारीला अडथळा होणार असल्याने पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























