एक्स्प्लोर

विवाहित डॉक्टरचं प्रेमप्रकरण, पत्नीची हत्या, 4 डॉक्टरांवर गुन्हा

सोलापूर: एका हायप्रोफाईल खून खटल्याचा तपास लावण्यात सोलापूर शहर पोलिसांना यश आलं आहे. अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या महिला डॉक्टरचा खुद्द डॉक्टर पतीनेच खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.   याप्रकरणी मारेकरी डॉक्टरच्या  प्रेयसीसह चार प्रतिथयश डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी  हा क्लिष्ट खून खटला उघडकीस आणला. दहा महिन्यापूर्वी घडलेल्या या हायप्रोफाईल खुनाचा कसा लागला तपास ?   हायप्रोफाईल खुनाचा कसा लागला तपास ? सोलापुरातील नामवंत डॉक्टर एस. प्रभाकर याचं गंगामाई हॉस्पिटल. सध्या हे सुसज्ज रुग्णालय पोलिसांच्या रडारवर आहे. याच रुग्णालयात कार्यरत असणारा मेंदूरोग तज्ञ डॉ. प्रसन्ना अग्रहार याचा पोलीस शोध घेत आहेत. डॉक्टर प्रसन्नवर आपल्याच डॉक्टर असलेल्या पत्नीचा खून केल्याचा आरोप आहे. गंगामाई हॉस्पिटलच्या अन्य तीन डॉक्टरांना सुद्धा या खून खटल्यात आरोपी बनवण्यात आलं आहे. सर्वांनी मिळून डॉक्टर रश्मी अग्रहार हिच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.   ९ जुलै २०१५ रोजी खून ९ जुलै २०१५ रोजी राहत्या घरी रश्मीचा खून झाला. पण डॉ. प्रसन्ना यांनी पत्नीला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगून त्यांच्याच रुग्णालयात दाखल केलं. याप्रकरणी ना पोलिसांना खबर दिली, ना शवविच्छेदन केलं. प्रसन्न यांनी स्वतः मृत्यू प्रमाणपत्र तयार करून अंत्यविधी उरकला.   डॉक्टर प्रसन्नचे मूळच्या बंगाली असलेल्या मेघ रॉय चौधरी हिच्याशी प्रेमसंबंध होते. त्याला डॉक्टर पत्नी रश्मीने विरोध केला होता. दोघांनी मिळून रश्मीचा खून केल्याचं पोलीस चौकशीत निष्पन्न झाला.   चार डॉक्टरांविरोधात गुन्हा प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. एस. प्रभाकर, डॉ. प्रसन्न अग्रहार, डॉ. अमित कुलकर्णी, डॉ. भाऊसाहेब गायकवाड आणि प्रेयसी  मेघ रॉय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. डॉक्टर पत्नी रश्मी अग्रहारचा खून करणं,  मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावणं,  कट रचून खून करणं आणि पोलिसांची दिशाभूल केल्याचा ठपका गंगामाई रुग्णालयाच्या डॉक्टरांवर ठेवण्यात आला आहे.   स्वत: पोलीस आयुक्तांचा पुढाकार अगोदरच्या दोन अधिकाऱ्यांना तपासात अपयश आल्यावर खुद्द पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या विशेष टीमलासोबत घेऊन या घटनेचा पर्दाफाश केला. पाचही आरोपी फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी शहर पोलिसांची विशेष पथके रवाना झाली आहेत. गेल्या दहा महिन्यापासून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न चालू होते. कुठलेच धागेदोरे मिळत नव्हते.   आपण केलेला खून पचला अशी धारणा या आरोपींची झाली होती. मात्र पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी तपासाची सूत्रे स्वतःच्या हाती घेतली. आणि दहा दिवसात या अतिशय किचकट बनलेल्या खुनाचा उलगडा झाला.

महत्त्वाच्या बातम्या

गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार

व्हिडीओ

MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Embed widget