एक्स्प्लोर
राष्ट्रवादी उमेदवाराच्या घरावर दगडफेक, सोलापूर एमआयएम शहराध्यक्षाला अटक
सोलापूर : सोलापूर एमआयएमच्या शहराध्यक्ष तौफिक शेखला पोलिसांनी अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक केल्याचा आरोप तौफिक शेखवर आहे. 19 फेब्रुवारीला सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील उमेदवार हरुण सय्यद यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली होती.
सोलापूर महापालिका निवडणुकीत एमआयएमकडून पतंगाच्या चिन्हावर तौफिक शेख निवडून आला आहे. निवडणुकीच्या प्रचारावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एमआयएम प्रचार रॅलीवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. राजकीय वैमनस्यातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप एमआयएमनं केला होता. निवडणुकीच्या आदल्या दिवशी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक केली, असा आरोप करत राष्ट्रवादीकडून तक्रार दाखल करण्यात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक केल्याचा गुन्हा तौफिक शेखवर दाखल करण्यात आला होता. घटनेच्या दिवसापासूनच फरार तौफिक शेख फरार होता. विजापूर नाका पोलिसांनी अखेर आज त्याला अटक केली आहे.
तौफिक शेखची कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिली आहे. मटका, दारु, जुगार अड्डे, खंडणी, मारामारी आणि सामाजिक शांतता भंग केल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. अशा वादग्रस्त व्यक्तीला एमआयएमच्या असदुद्दिन ओवेसी यांनी पक्षात महत्वाच स्थान दिलं आहे. तौफिक शेख पूर्वी काँग्रेसचा नगरसेवक आणि सुशीलकुमार शिंदे यांचा कट्टर समर्थक होता. पण तौफिक शेखने प्रणिती शिंदे यांच्या विरोधात एमआयएमकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. 26 नोव्हेंबरला जागा बळकावण्यासाठी एका तरुणाचं अपहरण केल्याप्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement