एक्स्प्लोर
सोलापूरच्या महापौरांनी अखेर तीन वर्षाचा थकीत टॅक्स भरला!
सोलापूर: पाचशे हजारच्या नोटा रद्द झाल्यानंतर अनेक रंजक गोष्टी घडत आहे. सोलापुरात चक्क महापौर सुशिला आबुटे यांनीच तीन महिन्यांचा थकीत मिळकत कर भरला आहे. दंडासह तब्बल सव्वा लाख रुपये त्यांनी पालिकेच्या तिजोरीत जमा केले आहेत.
जुन्या नोटा खपवण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल सध्या लढवल्या जात आहे. त्याअंतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांची बुकींग करणं, देवस्थानच्या देणगीमार्फत पैसा पांढरा करणं असे प्रकार समोर येत होते. आता पालिकेचा थकीत कर भरण्याचे प्रकारही समोर येत असल्याचं दिसतं आहे.
दरम्यान, सोलापूरच्या महापौरांनी गेल्या तीन वर्षापासून कर थकवल्याचं प्रकरण यानिमित्ताने समोर आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement