एक्स्प्लोर
संशयाला कंटाळून पत्नीसह दोन मुलींची हत्या, पतीची आत्महत्या
सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पती सुभाष अनुसेनं पत्नी स्वातीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. त्यानंतर दोन्ही मुलींना संपवलं आणि गळफास घेऊन आत्महत्या केली.
![संशयाला कंटाळून पत्नीसह दोन मुलींची हत्या, पतीची आत्महत्या Solapur : Husband allegedly killed wife and two daughters, commits suicide latest संशयाला कंटाळून पत्नीसह दोन मुलींची हत्या, पतीची आत्महत्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/12185031/Solapur-Murder-and-Suicide.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पंढरपूर : संशयातून सोलापुरात अख्ख्या कुटुंबाचा अंत झाला आहे. पत्नीकडून वारंवार व्यक्त होणाऱ्या संशयाला कंटाळून पतीने पत्नी आणि दोन मुलींची हत्या केली आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात ही घटना घडली आहे.
कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पती सुभाष अनुसेनं पत्नी स्वातीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. त्यानंतर दोन्ही मुलींना संपवलं आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत अधिक तपास सुरु केला आहे.
आरोपी पती सुभाष अनुसे याच्या खिशात पोलिसांना चिठ्ठी मिळाली आहे.
माळशिरस तालुक्यातील उंबरे गावात अनुसे कुटुंब राहत होतं. सुभाष हा शेती करीत होता, तर त्याच्या मुली ऋतुजा आणि प्रणिता या श्रीपूरमधील प्राथमिक शाळेत शिकत होत्या.
कुटुंबासह अकलूजमधील दवाखान्यात जातो, असं सांगून सुभाष दुपारी बाहेर पडला. आपल्या दोन्ही मुलींना शाळेतून घेऊन पुन्हा तो सुळेवाडी परिसरात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तिथे त्याने रात्री पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. नंतर दोन्ही मुलींना एकच गळफास लावून त्यांची हत्या केली. नंतर त्याने जवळच्याच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
दोन मुलींना शाळेच्या गणवेशातच फास लावण्यात आला होता. घटनास्थळी सुभाष याची दुचाकी आणि मुलींची शाळेची दप्तरं, डबे पोलिसांना मिळाले.
सुभाष कुटुंबासह रात्री उशिरा घरी न परतल्याने अनुसे कुटुंबाने पहाटे अकलूज पोलिसात मिसिंगची तक्रार दिली. सकाळी या चौघांचे मृतदेह सुळेवाडी घाटातील वनविभागाच्या जमिनीत असल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले.
सुभाषच्या सासऱ्यांनी मात्र या चौघांची हत्या इस्टेटीच्या वादातून झाल्याचा आरोप केला आहे. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी माळशिरस येथे आणण्यात आले असून परिस्थिती तणावपूर्ण आहे. सोलापूरचे पोलिस अधीक्षक विरेश प्रभू घटनास्थळी दाखल झाले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)