एक्स्प्लोर

आषाढी यात्रा तोंडावर तरीही पंढरपूरमधील कोरोना रुग्णसंख्या कमी होईना, प्रशासनाच्या चिंता वाढल्या

आषाढी कार्तिकी यात्रा तोंडावर आलेली असताना पंढरपूर शहर आणि तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत.

पंढरपूर : येत्या काही दिवसांमध्ये पंढरपूरमध्ये आषाढी कार्तिकीची यात्रा भरणार आहे. त्यामुळे कितीही निर्बंध असले तरी चार ते पाच हजार नागरिक बाहेरुन शहरात दाखल होतील. अशा पार्श्वभूमीवर सध्या पंढरपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीय. परिणामी प्रशासनासोबत नागरिकांचीही चिंता वाढत आहेत. यातही पंढपूर तालुक्यातील ग्रामीण भागाला याचा मोठा फटका बसला आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये बुधवारी नवीन 371 कोरोना रूग्ण आढळून आले असून यापैकी 117 एकट्या पंढरपूर तालुक्यातील आहेत. शहरात 10 तर ग्रामीण भागात 107 रूग्णांची नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण पंढरपूर तालुक्यात सापडले असून आजवर 25 हजार 744 जणांची नोंद आहे तर 503 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. सध्या 374 जणांवर उपचार सुरू आहेत.

पंढरपूर तालुक्यात ग्रामीण भागात अजूनही कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनावर उपचार घेत असलेल्या 374 पैकी 361 जण हे ग्रामीण भागातील आहेत तर 13 हे पंढरपूर शहरातील आहेत. आजवर ग्रामीण भागात 17 हजार 453 कोरोनाबाधित आढळून आले आहेत तर शहरात 8 हजार 291 जणांची नोंद आहे. बुधवारच्या अहवालानुसार 10 हजार 165 कोरोना चाचण्या जिल्हा ग्रामीणमध्ये झाल्या असून यापैकी 9 हजार 794 निगेटिव्ह आहेत. तर तीन जणांच्या मृत्यूची अहवालात नोंद आहे.

Ashadi Yatra | आषाढी यात्रेसाठी उद्यापासून पालख्यांचं प्रस्थान; भाजप अजूनही पायी वारीवर ठाम

कोरोना बळीचा आकडा पाचशे पार!
कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक फटका हा पंढरपूर तालुक्याला बसला असून येथे या काळात 502 जणांना आपले प्राण या आजारात गमवावे लागले आहेत. हा तालुका कोरोनामुळे अनेक दिग्गजांना मुकला आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अजूनही संपलेला नाही. संभाव्य तिसर्‍या लाटेची शक्यता गृहित धरून उपाययोजना केल्या जात आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या विषाणूने पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक थैमान घातल्याचे चित्र होते. पहिल्या व दुसर्‍या लाटेत मिळून पंढरपूर तालुक्यात 25 हजार 627 कोरोनाचे रूग्ण आढळून आले. यापैकी 502 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. या आजारावर मात करणार्‍यांची संख्या 24 हजार 784 इतकी असून मंगळवार 29 जूनच्या अहवालानुसार येथे अद्याप 341 जणांवर उपचार सुरू आहेत.

Ashadhi Wari 2021 : पायी वारीच्या परवानगीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये पंढरपूर तालुका हा कोरोना रूग्णांच्या बाबतीत अग्रेसर राहिला आहे. तसेच येथे सर्वाधिक मृत्यूंची ही नोंद आहे. पंढरपूर पाठोपाठ बार्शी तालुक्यात 455, माळशिरस 371, माढा 339, मोहोळ 331 असे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. पंढरपूर तालुक्याने अनेक दिग्गजांना कोरोनामुळे गमावले आहेत. यात राजकीय, आध्यात्मिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश आहे. येथील राजकीय क्षेत्राचे अतोनात नुकसान या आजाराने केले आहे. सुधाकरपंत परिचारक, आमदार भारत भालके, राजूबापू पाटील यांच्यासह भागवताचार्य वा.ना. उत्पात, रामदास महाराज जाधव यांच्यासह अनेकांना हा तालुका कोरोनामुळे मुकला आहे. पत्रकारिता क्षेत्रालाही याचा फटका बसला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत पंढरपूर भागात सर्वाधिक रूग्ण होते तर दुसर्‍या लाटेच्या वेळीही येथील रूग्णसंख्या वाढतच गेली आहे. दिवंगत भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेची पोटनिवडणूक झाली व यानंतर पंढरपूर व मंगळवेढ्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत खूप वाढ झाल्याचे दिसून आले. अद्यापही रूग्ण येथे सापडतच आहेत. पंढरपूर शहरातील कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आली असून येथे केवळ दहा जणांवर उपचार सुरू आहेत. मात्र, ग्रामीण भागात कोरोनाचा अद्यापही पूर्णतः आटोक्यात आलेला नाही. ग्रामीण भागातील 331 जण या आजारावर उपचार घेत आहेत. पंढरपूर शहरात आजवर 8 हजार 281 तर ग्रामीणमध्ये 17 हजार 346 रूग्ण नोंदले गेले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Vishwas Nangre Patil on DJ Ban: नागपुरातील डीजेबंदीवरून वाद पेटला, आता विश्वास नांगरे पाटलांचं 'त्या' अधिसूचनेबाबत महत्त्वाचं वक्तव्य; म्हणाले...
नागपुरातील डीजेबंदीवरून वाद पेटला, आता विश्वास नांगरे पाटलांचं 'त्या' अधिसूचनेबाबत महत्त्वाचं वक्तव्य; म्हणाले...
Pune Baramati Crime: अभ्यास अन् परीक्षेचं टेन्शन, बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल; वडिलांच्या डोळ्यादेखत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
अभ्यास अन् परीक्षेचं टेन्शन, बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल; वडिलांच्या डोळ्यादेखत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
Vidyanand Bapat: भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv News: 5 सुवर्ण, 6 रौप्य पदकं जिंकली, आज तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी मारली; कोण होत्या 'महाराष्ट्राची वाघिणी' अश्विनी पोळ?
5 सुवर्ण, 6 रौप्य पदकं जिंकली, आज तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी मारली; कोण होत्या 'महाराष्ट्राची वाघिणी' अश्विनी पोळ?

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidyanand Bapat: भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली अन्...; नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली अन्...; नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv News: कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण समोर
Pulwama Case NIA: पुलवामा प्रकरणातील आरोपीचा जामीन नाकारला; बहिणीच्या लग्नासाठी केलेला अर्ज, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याची परवानगी...
पुलवामा प्रकरणातील आरोपीचा जामीन नाकारला; बहिणीच्या लग्नासाठी केलेला अर्ज, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याची परवानगी...
Vidyanand Bapat: मारहाणीच्या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घेणार का? विद्यानंद बापट म्हणाले छे...छे..अजिबात नाही, कारण...
मारहाणीच्या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घेणार का? विद्यानंद बापट म्हणाले छे...छे..अजिबात नाही, कारण...
Wrestler Ashwini Mohite Paul Dharashiv News: महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
India Belgium Defence Deal: ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
Embed widget