एक्स्प्लोर
'या' कालावधीतील निवृत्त कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाचा लाभ
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मवत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 2006 ते 2009 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.

मुंबई : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मवत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 2006 ते 2009 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. परंतु थकबाकीपोटी शासनाच्या तिजोरीवर 2204 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. या निर्णयाच्या अंमलबाजावणीने दरवर्षी अतिरिक्त 319 कोटी रुपयांची गरज भासणार आहे. एकूण 1 लाख 11 हजार 146 सेवानिवृत्तीधारक याचा लाभ मिळणार आहे. तसेच सरकार 2204 कोटी रुपयांची थकबाकीची रक्कम एकरकमी देणार आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्यात थकित सहावा वेतन आयोगाचा निर्णय निकाली काढणे गरजेचे होते. त्याशिवाय सातवा वेतन आयोग लागू करण्यात अडचण येत होती. त्यामुळेच वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ उपसमितीची आज मंत्रालयात बैठक संपन्न झाली. या बैठकित हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीस वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यु.पी.एस मदान, वित्त सचिव नितीन गद्रे यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















