एक्स्प्लोर
Advertisement
साईभक्तांना खुशखबर, शिर्डीसाठी दररोज सहा विमानं
दरदिवशी शिर्डीसाठी मुंबईहून चार, दिल्लीहून एक तर विमान सुटेल. ट्रुजेटचं खाजगी विमान शिर्डी आणि हैदराबाद या दरम्यान उड्डाण करेल.
नाशिक : साईभक्तांसाठी केंद्र सरकारने खुशखबर दिली आहे. शिर्डीला जाण्यासाठी मुंबई, दिल्ली आणि हैदराबादहून दररोज सहा विमानं सुटणार आहेत. विमानाचे दर काय असतील, याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.
दरदिवशी शिर्डीसाठी मुंबईहून चार, दिल्लीहून एक तर विमान सुटेल. ट्रुजेटचं खाजगी विमान शिर्डी आणि हैदराबाद या दरम्यान उड्डाण करेल. साईंच्या दर्शनासाठी अनेक भक्त देशाच्या विविध भागातून शिर्डीला येत असतात. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी विमानसेवा उपयुक्त ठरण्याची चिन्हं आहेत.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून संमती मिळाल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या अखेरपासून ही विमान उड्डाणं सुरु होण्याची शक्यता आहे. राज्य हवाई वाहतूक सचिव वल्सा नायर सिंग यांनी डीजीसीएची अंतिम परवानगी बाकी असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे.
विमानाचे दर काय असतील, याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement