एक्स्प्लोर
माकडांना खाऊ देताना पर्यटक आंबोली घाटातील दरीत कोसळला
माकडांना खाऊ देताना गोव्यातील पर्यटक आंबोली घाटातील दरीत कोसळला, मात्र सुदैवाने त्याला वाचवण्यात यश आलं आहे

सिंधुदुर्ग : 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय रविवारी आंबोली घाटात आला. माकडांना खाऊ देताना घाटातील दरीत कोसळूनही गोव्याहून आलेला पर्यटक सुदैवाने बचावला आहे. प्रविण नाईक असं या पर्यटकाचं नाव असून तो मूळ गोव्याचा आहे. रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास तो माकडांना खाद्य देत होता. त्यावेळी त्याचा तोल गेला आणि तो धबधब्याजवळ 100 फूट खोल दरीत कोसळला. पोलिस हवालदार गुरुदास तेली तसंच जीवरक्षक बाबल आल्मेडा आणि किरण नार्वेकर यांच्या टीमने त्याला दरीतून बाहेर काढलं. त्याचा डोक्याला दुखापत झाली असून आंबोली ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर गोव्यातील रुग्णालयात दाखल केलं आहे.
आणखी वाचा























