NIlesh rane: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (sindhudurg latest news) सह्याद्रीच्या पट्यात हनुमंत गड (Fort Hanumant) आहे.  शिवकालीन इतिहासाची साक्ष असलेला हा किल्ला दुर्लक्षित आहे. दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी गावात असलेला हनुमंत गड छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्यात देवाणघेवाण आणि टेहाळणी साठी सामावून घेतला होता. 26 एकर जागेत हा हनुमंत गड पसरला असून गडावर हनुमानाची मूर्ती सापडल्याने त्याकाळी हनुमंत गड (Fort Hanumant) असं नाव पडले असावे, असा समज आहे. सह्याद्री प्रतिष्ठानने हनुमंत गडावर (Fort Hanumant) छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार आणि तोफगाडा लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो शिवभक्त हनुमंत गडावर (Fort Hanumant) उपस्थित होते. पदश्री परशुराम गंगावणे, माजी खासदार निलेश राणे या सोहळ्याला उपस्थित होते.


हनुमंत गडावर बोलताना निलेश राणेंनी दारूच्या बाटल्या गडावर कोणी आणल्या तर त्याला बाटली सकट खाली फेकून देऊ असा सज्जड दमच दिला. त्यामुळे 31 डिसेंबर ला गडकिल्ल्यांवर दारूच्या पार्ट्या करण्यावर सिंधुदुर्गात तरी शिवभक्तांची करडी नजर असणार आहे. गडकिल्ले हे आमचं दैवत आहे. पहिल्यांदा खासदार झालो तेव्हा माझं पहिलं काम केंद्र सरकारला सांगितलं होतं की तुम्ही विजयदुर्गासाठी आणि सिंधुदुर्गासाठी पैसे द्या. आपल्याला वेडंच छत्रपती शिवाजी महाराजचं. शिवभक्त हा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी वेडा असतो. शिवभक्त राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असला तरी गडावर कार्यक्रम असला तरी येणार. 


जसे राणेंना कायदे नियम कळत नाही तसे शिवभक्तांनाही कळत नाही. शिवभक्तांना काय हवं असतं छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या गडकिल्ल्यांवर कोणी वाकड्या नजरेने बघायचं नाही. सह्याद्री प्रतिष्ठान ने केलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच लोकार्पण सोहळा साजरा केला त्याला निलेश राणे यांनी मानाचा मुजरा केला. 


अफजल खानचं थडग तोडायला आपण परवानगी मागितली नाही. कारण सरकार आपलं आहे. आपल्यासारखी लोक महाराष्ट्रात असेपर्यंत कोणाची परवानगी मागणार सुद्धा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कोणी वाकड्या घेतलं तर आपला शिवभक्त केव्हा विसरत नाही. शिवभक्त जेवढ मागतील तेवढं सरकारने दिलं नाही तर राणे कुटुंबीय देतील, असे निलेश राणे म्हणाले.


ही बातमी वाचाच:


Hasan Mushrif News : ऊस तोडणी मुकादमांवर नियंत्रण ठेवून साखर कारखाने आणि वाहतूकदारांची लुबाडणूक थांबवा; हसन मुश्रीफ यांची अधिवेशनात मागणी