Anil Deshmukh: एक वर्ष एक महिना 27 दिवसानंतर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आले आहेत. देशमुखांचं स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेतेही उपस्थित होते. अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येताच कार्य़कर्त्यांनी एकच जल्लोष केला.. शिवाय जोरदार घोषणाबाजी केली... अनिल देशमुखांवर पुष्पवृष्टी करण्यात आली... यावेळी अनिल देशमुखांच्या स्वागतासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील उपस्थित होते... तुरुंगाबाहेर येताच देशमुखांनील आपल्यावरील सर्व आरोप खोटे, तथ्य़हीन असल्याची पहिली प्रतिक्रिया दिली.. त्यानंतर आर्थर रोड जेल ते सिद्धीविनियक मंदिरापर्यंत अनिल देशमुखांनी रॅली काढली... यावेळी कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली होती... देशमुखांसोबत रॅलीतही सर्व दिग्गज नेते उपस्थित होते... सिद्धिविनायक मंदिराजवळ पोहोचताच देशमुख यांच्या पत्नी भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या.. एका वर्षानंतर पती अनिल देशमुखांना पाहिल्यानंतर त्यांच्य़ा अश्रूंचा बांध फुटला.. यावेळी अनिल देशमुखही भावूक झालेले पाहायला मिळाले... यानंतर देशमुखांनी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं.. तिक़डे देशमुखांच्या नागपूरच्या घराबाहेरही कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. 


मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आले -
मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आले आहे. परमवीर सिंह यांनी माझ्यावर शंभर कोटींचा आरोप लावला. पण त्याच परमवीर सिंह यांनी कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्र दिलं, त्यामध्ये मी ऐकीव माहितीच्या आधारावर आरोप केला होता, माझ्याकडे कोणताही पुरवा नाही असं प्रतिज्ञापत्रात सांगितलं होतं, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी तुरुंगाबाहेर आल्यानंतर दिली. यावेळी अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याच्यावरही वक्तव्य केलं. त्याशिवाय न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं. 


1 नोव्हेंबर 2021 ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीनं देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. ईडीनं अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून दोन गुन्ह्यांप्रकरणी अटकेत होते. वर्षभरानंतर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आले आहेत. अनिल देशमुख बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रसमधील दिग्गज नेते आले होते. 


नेमकं प्रकरण काय?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी त्यावेळचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयनं प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काही जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या प्रकरणाला अनेक फाटे फुटले. परमबीर सिंहांनी लेटर बॉम्ब टाकला होता. आता या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे. 1 नोव्हेंबर 2021 ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीनं देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. ईडीनं अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळं देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून दोन गुन्ह्यांप्रकरणी अटकेत होते.