Maharashtra Sindhudurg Crime News : कोकणात सध्या हापुस आंब्याचा हंगाम सुरू आहे. त्यात काही ठिकाणी आंबा चोरीच्या घटनाही समोर यायला लागल्या आहेत. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील वेंगुर्ल्यात (Vengurla) आंबा चोरीच्या रागातून तिघांना नग्न करून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. वेंगुर्ले शहरातील उभादांडा-वरचेमाडवाडी येथे घडली आहे. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले शहरातील उभादांडा-वरचेमाडवाडी येथे आंबा चोरीच्या रागातून वेंगुर्लेतील तिघांना जातिवाचक शिवीगाळ करत नग्न करून बेदम मारहाण करून त्याचे व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) करण्यात आले आहेत. या प्रकरणातील फरार संशयित 7 जणांना वेंगुर्ले पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मारहाण झालेल्या गौतम वेंगुर्लेकर यानं तक्रार दिल्यानंतर वेंगुर्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एकूण या प्रकरणात दहा ते बारा जणांचा समावेश आहे. मारहाण करणाऱ्यांनी त्यांच्या गड्यांचंही नुकसान केलं आहे. जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणं, गाड्यांची नुकसान करणं, तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री एकाला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आलं. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर इतर सहा संशयित आरोपींना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं असून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


मारहाण करताना तिघाना झाडाला बांधून, नग्न करुन मारहाण करण्यात आली. दरम्यान याबाबत मारहाण झालेल्या गोतम वेंगुर्लेकर यानं दिलेल्या तक्रारीनुसार प्रसाद मांजरेकर, प्रतिक धावडे, रावशा शेलार, गौरव मराठे, दिनेश गवळी, योगी सरमळकर यांच्यासह दहा ते बारा जणांवर जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणं, तसेच अश्लील चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयित वेंगुर्ले येथून फरार झाले आहेत. आंबा चोरी केल्याच्या संशयावरून ही मारहाणी केली आणि नग्नावस्थेमधील मारहाणीचा व्हिडीओ करून तो व्हायरल केला. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस चौकशी करत आहेत. तक्रारी वरून वेंगुर्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :