Supriya Sule On BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे (BMC Election) सर्वांचं लक्ष लागून आहे. लवकरच पालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात प्रत्येक पक्षाकडून महापालिकेवर झेंडा रोवण्याची तयारी सुरु झालीय. महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्र लढणार की वेगवेगळं याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच होणार असल्याचं म्हटलं आहे. 


धुळ्यात बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता येणार आणि शिवसेनेचा महापौर बसणार आहे. कोरोना काळामध्ये ज्याप्रकारे मुंबई महानगरपालिकेने काम केलं आहे, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा शिवसेनेची सत्ता येणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.


केंद्र सरकारकडून ईडी यंत्रणेचा गैरवापर


सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, केंद्र सरकारकडून ईडी यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. अनिल देशमुख यांच्यावर जवळपास 109 वेळा ईडीतर्फे चौकशी करण्यात आली. तर मग आधी 108 वेळा यंत्रणांनी तपासणी केली असता त्यांना काहीच मिळाले नाही का? असा प्रश्न विचारत केंद्र सरकारच्या ईडीच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच यंत्रणा ही पक्षाने चालवायची नसते तर सरकारमध्ये जी सिस्टीम असते त्या सिस्टीमने यंत्रणा चालवायची असते असं म्हणत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.


केंद्र सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी अमृत योजना आणि स्मार्ट सिटी योजना या दोन्ही योजना सक्षम फेल झाल्या असल्याचे देखील मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.


सध्या वाढत असलेल्या महागाईवर बोलताना सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ तातडीची बैठक बोलवावी आणि सर्व राज्यांना या संदर्भामध्ये बैठकीत सामाविष्ट करून महागाई कमी करण्यासाठी काय तोडगा काढता येईल याबाबत चर्चा करावी असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.


महत्वाच्या इतर बातम्या


Maharashtra Election : महाराष्ट्रातील निवडणुकांसदर्भात आज महत्वाचा फैसला; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष


BMC : मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; नकाशा आणि लोकसंख्या... असा असेल तुमचा वॉर्ड