Gondia News गोंदियावाहतुकीचे नियम तोडून बेशिस्त वाहतूक केल्यामुळे अनेक अपघात (Accident) होत असतात. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळण्यासंदर्भात पोलीस प्रशासन वेळोवेळी मार्गदर्शन आणि गरज पडल्यास कारवाईचा बडगा देखील उगारत असतात. मात्र याच अपघातातून एकट्या गोंदिया जिल्ह्यात (Gondia News) 120 दिवसात 98 अपघात झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तर यात 47 जणांचा अपघातात मृत्यूही झालाय.


मागील 120 दिवसांत घडलेल्या अपघातांमध्ये 90 टक्केपेक्षा जास्त अपघात वाहनांच्या भरधाव वेगामुळे झाल्याचे समजून आले आहे. ही आकडेवारी वाहनधारकांची चिंता वाढविणारी आहे. यावरून 'अति घाई अन् संकटात नेई' अशीच स्थिती सध्या दिसून येत आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी केले आहे.


120 दिवसात 98 अपघात


प्रत्येक शहरात वाढत्या वाहनांची संख्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वाहतूक व्यवस्थेवर मोठा तान निर्माण होत आहे. अशातच त्यातून वाढत असलेले अपघाताचे प्रमाण ही एक चिंतेचे बाब आहे. एकट्या गोंदिया जिल्ह्यात गेल्या 120 दिवसात 98 अपघात झाले आहे. तर यात तब्बल 47 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश अपघात हे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी केले आहे. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.  


बेशिस्त वाहनधारकांवर थेट दंडात्मक कारवाईचा बडगा


वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भंडारा (Bhandara)जिल्ह्यातील तुमसर येथे देखील कठोर कारवाई करण्यात आली आहे. भंडारा हे व्यावसायिक दृष्ट्या जिल्ह्यातील सर्वात मोठं शहर आहे. इथं नजीकच्या मध्यप्रदेशातूनहीं नागरिक खरेदी-विक्रीसाठी येत असतात. ग्राहकांच्या वाहनांमुळे वर्दळीच्या मुख्य बाजारपेठेतील मार्गावर अनेकदा वाहतुकीचा खोळंबा निर्माण होतो. यावर नियंत्रण मिळावं आणि वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करून तुमसर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी, तुमसरच्या सहायक पोलीस अधीक्षक रश्मिता राव यांनी एक मोहीम हाती घेतली आहे.


या कारवाईत त्या स्वतः एकट्याच तुमसर शहराच्या मुख्य बाजारपेठेत पायदळ फिरून बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करीत आहेत. सध्या वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जातोय. त्यामुळे तुमसरच्या लेडी सिंघम दिसताच नागरिकांची एकच धावपळ होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. 


शंभराहून अधिक वाहनधारकांवर कारवाई


भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे मागील तीन दिवसात साधारणतः शंभराहून अधिक वाहनधारकांवर वाहतुकीचे नियम तोडल्याची कारवाई करण्यात आली आहे. अशी कारवाई करणाऱ्या त्या भंडारा जिल्ह्यातील एकमेव आणि पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. सहायक पोलीस अधीक्षक रश्मिता राव या दिवस असो की रात्र, रस्त्यावर कारवाईसाठी दिसताच नागरिकांच्या तोंडातून लेडी सिंघम आल्याचीच चर्चा सुरू आहे. जे वाहतुकीचे नियम तोडतात त्यांची कारवाईतून वाचण्यासाठी वाहनधारकांची एकच धावपळ बघायला मिळत आहे.   


इतर महत्वाच्या बातम्या