Onion Price: सध्या कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) अडचणीत आहेत. कारण कांद्याच्या दरात घसरण (Onion Price) होताना दिसत आहे. कांद्याचा उत्पादन खर्च निघेल एवढा दरही सध्या कांद्याला मिळत नाही. सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) हटवून देखील दर जैसे थे च आहेत. कारण सरकारनं निर्यातीच्या संदर्भात काही अटी शर्ती घातल्या आहेत. दरम्यान, सणासुदीच्या काळात कांद्याचे दर वाढणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. सरकारनं कांद्याचे दर निंयत्रीत राहावे यासाठी योग्य ते नियोजन केलं आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी कांद्याच्या उत्पादनात घट अपेक्षित आहे. त्यामुळं सणासुदीच्या काळात कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं सर्वसमावेशक उपाययोजना सुरु केल्या आहेत. सरकार पाच लाख टनांचा बफर स्टॉक तयार करत आहे. त्यामुळं सणासुदीच्या काळात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता कमी आहे. कारण जर या काळात कांद्याचे दर वाढले तर सरकार लगेच कांद्याचा बफर स्टॉक बाहेर काढेल, त्यामुळं दर वाढणार नाही, नियंत्रणात राहतील अशी शक्यता आहे. 


सरकार करणार 5 लाख टनांचा बफर स्टॉक 


सरकार 5 लाख टनांचा बफर स्टॉक तयार करण्यासाठी शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करत आहे. मुख्य उत्पादन स्थळांपासून दूर असलेल्या भागात अधिक साठवण केंद्रे तयार केली जात आहेत. सध्या रेडिएशनद्वारे पूर्वीपेक्षा जास्त कांदा साठवला जात आहे. यावेळी उत्पादन क्षेत्रापासून दूर असलेल्या भागात अधिकाधिक कांद्याची साठवणूक करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे गरजेच्या वेळी पुरवठा करणे सोपे होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ लागू नये आणि लासलगाव सारख्या मोठ्या बाजारपेठांपासून दूर असलेल्या भागातील ग्राहकांच्या किंमती वाढू नयेत म्हणून वाहतुकीसाठी रेल्वे नेटवर्कचा वापर वाढवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. 


लासलगावमध्ये 50 हजार टन कांदा साठवला जाणार 


मिळालेल्या माहितीनुसार मागील वर्षी प्रायोगिक तत्त्वावर महाराष्ट्रातील लासलगाव येथे 1200 टन कांद्याचा साठवणूक करण्यात आली होती. यावेळी सुमारे 50 हजार टन कांदा साठवला जाणार आहे. कांदे 3 ते 4 महिन्यांपेक्षा जास्त काळ साठवले जाऊ शकत नाहीत. कोल्ड स्टोरेजमध्ये देखील 25 टक्क्यांपर्यंत नुकसान होते. रेडिएशन प्रक्रियेवरील नुकसान 10 ते 12 टक्क्यांपर्यंत कमी होते. 


महत्वाच्या बातम्या:


Onion Export : कांदा निर्यातबंदी हटवली नाहीच, 31 मार्चपर्यंत बंदी कायम, केंद्राच्या स्पष्टीकरणामुळे शेतकरी आक्रमक