इंदापूर : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी इंदापूर शहरातील संविधाना चौकात जीवघेणा  हल्ला केला. तहसीलदार श्रीकांत पाटील यांची गाडी संविधान चौकात आली असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रोडने जोरदार हल्ला चढविला. यानंतर डोळ्यात मिरची पूड टाकण्याचा प्रयत्न झाला. यानंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हल्ला केल्यानंतर संशयित फरार झाले. कायदेशीर मार्गाने जाणार असून पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे श्रीकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 






डोळ्यात मिरची पूड टाकण्याचा प्रयत्न  


तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, नेहमीप्रमाणो मी इंदापूर प्रशासकीय भावनाकडे निघालो होतो. संविधान चौकात माझी गाडी आली तेव्हा चार चाकी गाडीतून एक हल्लेखोर उतरला आणि लोखंडी राॅडने त्यांनी थेट माझ्यावर हल्ला चढवला. आमच्या अंगावर मिरचीची पूड टाकण्याचा प्रयत्न झाला. यावेळी माझ्या गाडीत चालक आणि मी होतो. आम्ही आमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आणखी दोन ते तीन हल्लेखोर गाडीतून उतरून आले, त्यांनी देखील आमच्यावर हल्ला चढवला. 


कर्मचाऱ्यांनी मूक मोर्चा काढला


दरम्यान, तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. इंदापूर तहसील कार्यालयातील कामगारांनी काम बंद करत काळ्या फिती लावून तहसिल कार्यालयापासून पोलीस स्टेशनपर्यंत मूक मोर्चा काढत घटनेचा निषेध नोंदवला. हल्ला केलेल्या आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी केली. बारामतीमध्येही तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. तहसीलदार यांच्यावरील हल्ला झाल्यानंतर नाकाबंदी करत पोलीस प्रशासनाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली असून एका आरोपीला ताब्यात घेतल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.






इतर महत्वाच्या बातम्या