Yavatmal News यवतमाळ : यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील म्हसोबा तांडा आणि अंजि येथे 19 जणांना जेवणातून विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना घडलीय. शिळे मटण खाल्ल्याने 19 जणांना मटनाच्या जेवणातून ही विषबाधा (Poisoning) झाली आहे. यात लहान मुलांचाही समावेश असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. ज्यांना ही विषबाधा (Food Poisoning) झाली त्यात 13 पुरूष आणि 6 महिलांचा समावेश आहे. या सर्वांवर सध्या यवतमाळच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार केले जात आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.   


शिळे मटण खाल्ल्याने विषबाधा 


यवतमाळच्या (Yavatmal News) आर्णी तालुक्यातील मसोबा तांडा इथे एक कौटुंबिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मटणाचे जेवण ठेवण्यात आले होते. मात्र, सर्वांचे जेवण आटोपल्या नंतरही बरेचसे मटण शिल्लक राहीले होते. परिणामी ते दुसऱ्या दिवशीही जेवणात वाढण्यात आले. मात्र आज बुधवारी दुपारच्या सुमारास अचानक त्यातील 19 जणांना त्रास होत असल्याचे निदर्शनात आले. त्यानंतर त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार दरम्यान हा प्रकार शिळं मटण (Food Poisoning) खाल्ल्याने झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सध्या सर्वांची प्रकृती ही स्थिर असून डॉक्टर पुढील उपचार करत आहे. तर काहींना घरी देखील सोडण्यात आले आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.   


तीन चिमुखल्यांसह 19 जणांना समावेश 


भारत संतोष जाधव (21), भारती गणेश राठोड (30),निर्मला दिलीप जाधव(45), दिलीप रामसिंग जाधव (50), नम्रता गणेश राठोड (8), निलेश दिलीप जाधव (35), जगदीश राठोड (22), उकंडा सूर्यभान राठोड (40), उदयसिंग श्रीराम चव्हाण (34),बेबी उकंडा राठोड (45), पल्लवी गजानन जाधव (35) किरण निलेश जाधव (33), गजानन प्रल्हाद जाधव (28), सुरेखा बाबुलाल राठोड (35)प्रगती संतोष जाधव (19) सगळे रा. म्हासोबा तांडा, भारत हरीचंद जाधव (32), दर्पण भारत जाधव (6), विजू गणेश जाधव वय (7) राहणार अन्जी, असे उपचार सुरू असलेल्या रुग्णाची नावे आहे.


                                            


इतर महत्वाच्या बातम्या