Gadchiroli News गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli News) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एका गरोदर मातेला (Pregnant Woman) रस्ता पार करण्यासाठी चक्क जेसीबीच्या बाकेटचा आधार घ्यावा लागला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचे भीषण वास्तव या निमित्याने पुन्हा एकदा समोर आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात अत्यंत महत्वाचा भाग म्हणून आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गाची ओळख आहे.


आलापल्ली ते भामरागड या 130-डी क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विविध ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र, रहदारीसाठी पर्यायी मार्ग व्यवस्थित आणि मजबूत न केल्याने मागील दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्यायी मार्ग वाहून गेलाय. त्यामुळे दोन दिवसापासून आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गावर रहदारी पूर्णपणे बंद झाली आहे. याचा फटका आता गरोदर मातेलाही बसला आहे. आधीच प्रसूतीकळा आणि त्यात असा जीवघेणा प्रवास करण्याची वेळ आता या गरोदर मातेवर आल्याने स्थानिकांमधून रोष व्यक्त केला जातोय. 


चक्क जेसीबीच्या बकेटमध्ये बसून रस्ता पार करण्याची नमुष्की


राज्यात एकीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या योजनांची अमलबजावणी केली जात आहे. तर दुसरीकडे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे गरोदर मातेला चक्क जेसीबीच्या बाकेटचा आधार घेत मार्ग काढावा लागतो आहे. भामरागड तालुक्यातील कुडकेली येथील झुरी संदीप मडावी या गरोदर मातेला अचानक प्रसूतीच्या कळा आल्याने ती रुग्णालयासाठी निघाली. मात्र रस्ता वाहून गेला असल्याने तिला समोर जाता आले नाही. तेव्हा रस्त्याच्या कामासाठी कामावर उभे असलेल्या जेसीबीच्या बकेटमध्ये गरोदर मातेला बसवून तिला रस्ता पार करून देण्यात आला. यावरून गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्य समस्या किती बिकट बनते, याची प्रचिती नव्यानं पुढे आली आहे.


गडचिरोली जिल्ह्याला पाऊसाचा रेड अलर्ट


 गडचिरोली जिल्ह्याला आज अवमान खात्याने  गडचिरोली जिल्ह्याला पाऊसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात काल रात्री पासून काही भागात मध्यम स्वरूपाचं पाऊस पडतो आहे. तर काही ठिकाणी पाऊसाच जोर अधिक आहे. दक्षिण गडचिरोली जिल्ह्यात काल रात्री पाऊसाचा जोर अधिक होता. त्यामुळे सिरोंचा तालुका मुख्यालय परिसरातील काही भागासह एका मुलांच्या हॉस्टेमध्ये देखील पाणी शिरलं होत. त्यामुळे अनेक विद्यार्थी तिथे अडकले होते. मात्र त्यांना पोलिसांच्या बचाव पथकाने तात्काळ सुरक्षित स्थळी हलवलं. तर सिरोंचापासून अगदी जवळ 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुर्यपल्ली गावात तलाव ओव्हर फ्लो झाल्यामुळे तलावाला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे गावात पाणी शिरलय. यात 15 हुन अधिक घरात पाणी शिरलं होतं, सध्या त्यांना आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिसांनी सुरक्षित स्थळी हलवले आहे.  


सद्या जिल्ह्यातील पावसामुळे बंद मार्ग 


1. आलापल्ली – भामरागड राष्ट्रीय महामार्ग (कडकेली नाला)
2. एटापल्ली – गट्टा अलगंडी रस्ता (बांडीया नदी)
3. चौखेवाडा- एटापल्ली- आलापल्ली राज्यमार्ग (एटापल्ली जवळ स्थानिक नाला)


जिल्ह्यातील पर्जन्यमान (मि.मी.)


19 जुलै, 2024 चे सकाळी 8.30 वाजता चे नोंदीनुसार जिल्ह्यात एकूण सरासरी 52.0 मि.मी. पाऊस झालेला आहे, 40 पैकी 13 मंडळामध्ये अतिवृष्टी ची नोंद झालेली  असुन सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा मंडळमध्ये सर्वाधिक 270.8 मि.मी. पावसाची नोंद आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या