मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही. त्याबद्दल काही बोलणार नाही, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. राज ठाकरे यांच्या टिकेवर बोलताना शिवसेना नेते तथा मंत्री सुभाष देसाई यांनी चांगला पटलवार केला आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, शुभ बोल रे नाऱ्या म्हणीप्रमाणे काम चांगलं होत असेल तर चांगल्या शुभेच्छा द्या. चांगल्या निर्णयाचं स्वागत करा. अडचणी सगळीकडे आहेत. देशातील सगळी सरकारं अडचणी आहेत. त्यामुळं टीका करण्याऐवजी सूचना करा, सल्ला द्या, असं देसाई यांनी म्हटलंय.

एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात राज ठाकरे यांनी कोरोना संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभाराचं, कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. याविषयी विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही असं वक्तव्य केलं. तसंच हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. जिथे एकोपा नाही, एकमत नाही ते जास्त काळ टिकेल, असं वाटत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. यावर सुभाष देसाई यांनी पलटवार केला आहे.

Majha Maharashtra Majha Vision 2020 | उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही : राज ठाकरे 

काय म्हणाले राज ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही. त्याबद्दल काही बोलणार नाही,असं राज ठाकरे म्हणाले. हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. जिथे एकोपा नाही, एकमत नाही ते जास्त काळ टिकेल, असं वाटत नाही, असं त्यांनी सांगितलं. सरकारकडून लावलेले निर्बंध, टेलिव्हिजनवरील बातम्या आणि व्हॉट्सअॅपवरचे मेसेज यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहेत. काळजी घेणं गरजेचं आहे पण घाबरुन घरात बसणं योग्य नाही. लोकांना मानसिक विवंचनेतून बाहेर काढायला हवं. त्यामुळे सगळ्या गोष्टी पूर्ववत करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. काळजी घ्या, पण शटडाऊन आणि लॉकडाऊन नको, असंही ते म्हणाले. लोकांना मानसिक विंवचनेतून बाहेर काढण्याची जबाबादारी सरकारची आहे. त्यासाठी काही गोष्टी सुरु करणं आवश्यक आहे. आज उद्योग बंद आहेत, दुकानं बंद आहेत, सगळे घरात बसून आहेत, नोकरी टिकेल की नाही याचीही खात्री नाही. अनेकांना नोकरीवरुन काढलंय. यावर सरकार काय विचार करतंय, या गोष्टी सरकारने सांगितल्या पाहिजे. त्यामुळे सगळं चालू करा असं माझं मत आहे."


टीका करण्याऐवजी सूचना करा -सुभाष देसाई
आपल्याला कोरोनासोबत जगावं लागेल. कोरोनाचं एका बाजूला व्यवस्थापन करावं लागणार आहे तर दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. सुभाष देसाई म्हणाले की, उद्योग विभागानं उद्योगांना चालना देण्यासाठी चांगल्या सुविधा द्यायला सुरु केल्या आहेत. एमआयडीसीने उद्योजकांना तयार शेड देण्याची तयारी केली आहे. नवीन गुंतवणूकदारांना उद्योगमित्र उपलब्ध करुन देणार आहोत. महापरवाना ही योजना सुरु केली आहे. 48 तासात उद्योगासाठी परवानगी देण्यात येईल, म्हणजे तात्काळ त्यांना उत्पादन घेता येऊ शकेल. महाजॉब्स ही देखील चांगला उपक्रम आपण सुरु केला आहे. याला युवकांचा प्रतिसाद करतोय. राज ठाकरे यांच्या टिकेवर बोलताना देसाई म्हणाले की, शुभ बोल रे नाऱ्या म्हणीप्रमाणे काम चांगलं होत असेल तर चांगल्या शुभेच्छा द्या. चांगल्या निर्णयाचं स्वागत करा. अडचणी सगळीकडे आहेत. देशातील सगळी सरकारं अडचणी आहेत. त्यामुळं टीका करण्याऐवजी सूचना करा, सल्ला द्या, असं त्यांनी म्हटलंय. भाजप-शिवसेना एकत्रित येण्याबाबत ते म्हणाले की, आता ती वेळ निघून गेली. जेव्हा आमच्या हाताला सांभाळण्याची गरज होती त्यावेळी झिडकारलं. जुन्या मित्रांना त्यांचा मार्ग आहे. त्यांनी त्या मार्गाने जावे, त्यांना शुभेच्छा. एकटे लढण्याच्या धोरणाला आमच्या शुभेच्छाआहेत, असं देसाई म्हणाले.


हे ही वाचा

कुटुंबात देखील कुरबुरी होतातच, मात्र सरकारमध्ये अंतर्विरोध नाही : मंत्री बाळासाहेब थोरात

राम मंदिराचं भूमिपूजन धूमधडाक्यातच व्हायला हवं, पण ही वेळ नाही : राज ठाकरे

राज्य सरकारचं स्टेअरिंग नेमकं कोणाच्या हातात, हेच समजत नाही : देवेंद्र फडणवीस

कोरोनामुळं उद्योजकांचं मोठं नुकसान, लवकरच विशेष पॅकेजची घोषणा : उद्योगमंत्री सुभाष देसाई

Majha Maharashtra Majha Vision | हे लिव्ह-इन रिलेशनशिप आहे, कुटुंब वगैरे नाही, त्यामुळे हे सरकार टिकेल असं वाटत नाही : देवेंद्र फडणवीस 

Majha Maharashtra Majha Vision 2020 | आरोग्य विभागातील सगळ्या रिक्त जागा भरणार : राजेश टोपे