मुंबई : 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' एबीपी माझाच्या या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासंदर्भातील आपलं व्हिजन स्पष्ट केलं. त्यावेळी बोलताना राज्य सरकारचं स्टेअरिंग नेमकं कोणाच्या हातात आहे हेच मला समजत नाही' , असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'सध्याचं सरकार म्हणजे एक ट्रेन आहे, अनेकदा ट्रेनला मागे इंजिन असतं, एक पुढे असतं, पण याला मध्येही एक इंजिन आहे. आणि तिघेही आपापल्या दिशेने ते इंजिन ओढत आहेत.', असंही ते म्हणाले.
सध्या राज्य सरकारबद्दल ज्यावेळी चर्चा होते. त्यावेळी नेहमी या सरकारचं स्टेअरिंग कोणाच्या हाती आहे, याबाबत सर्वाधिक चर्चा रंगलेल्या दिसतात. तुम्हाला काय वाटतं स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे. या प्रश्नाला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना मिळून ठरवायचं आहे, नेमकं स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे. पण खरं सांगू का, राज्य सरकारचं स्टेअरिंग नेमकं कोणाच्या हातात आहे हेच मला समजत नाही. सध्याचं सरकार म्हणजे एक ट्रेन आहे, अनेकदा ट्रेनला मागे इंजिन असतं, एक पुढे असतं, पण याला मध्येही एक इंजिन आहे. आणि तिघेही आपापल्या दिशेने ते इंजिन ओढत आहेत. त्यामुळे हे नेमकं चालंल कुठे आहे आणि याचा प्रमुख कोण आहे, हे समजणं कठिण आहे. खरं तर राज्याचा प्रमुख मुख्यमंत्रीच असतात. परंतु, अनेक सुपर मुख्यमंत्री पाहायला मिळतात, अनेक स्वयंघोषित मुख्यमंत्री पाहायला मिळतात. अनेक स्वयंघोषित नेते पाहायला मिळतात. अनेक नेते निर्णय घेताना दिसतात. त्यामुळे कोणी काहीही केलं, तरी हा संशोधनाचा विषय आहे की, नेमकं या सरकारचं स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे.'
महाविकास आघाडीला ऑटोरिक्षाची उपमा देता, तर भाजपला कोणत्या गाडीची उपमा देणार यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'भाजपला गाडीची उपमा देण्याची गरज नाही. आम्ही देशातील एक सर्वात मोठा पक्ष आहोत. देशात आमचं राज्य आहे. महाराष्ट्रात जनतेने ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून दिल्या, असा भाजप पक्ष आहे. हे ठिक आहे की, सर्वाधिक जागा असूनही आम्ही विरोधी पक्षात आहोत. कधीकधी असंही मान्य करावं लागतं.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'सध्याच्या सरकारला गाडीची उपमा यासाठी दिली होती की, ते ज्या गतीनं काम करत आहेत किंवा ज्या पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे म्हटलं होतं की, हे ऑटोरिक्षा सरकार आहे. आणि या ऑटोरिक्षा सरकारमध्ये तीन चाकं तीन दिशेला जात आहेत.'
पाहा व्हिडीओ : हे सरकार म्हणजे, लिव्ह-इन रिलेशनशिप : देवेंद्र फडणवीस
महत्त्वाच्या बातम्या :
Majha Maharashtra Majha Vision 2020 | उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही : राज ठाकरे
कोरोनामुळं उद्योजकांचं मोठं नुकसान, लवकरच विशेष पॅकेजची घोषणा : उद्योगमंत्री सुभाष देसाई
कुटुंबात देखील कुरबुरी होतातच, मात्र सरकारमध्ये अंतर्विरोध नाही : मंत्री बाळासाहेब थोरात