एक्स्प्लोर

महाविकासआघाडीची सकारात्मक चर्चा, उद्या पुन्हा बैठक होणार : पृथ्वीराज चव्हाण

महाविकासआघाडीतल्या तिन्ही पक्षांची आज पहिली संयुक्त बैठक पार पडली. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल? महाविकासआघाडी सत्तास्थापनेचा दावा कधी करणार? या प्रश्नांची उत्तरे आजच्या बैठकीनंतर मिळतील, अशा आशा राज्यातील जनतेला होत्या.

मुंबई : मोठ्या प्रतीक्षेनंतर महाविकासआघाडीतल्या तिन्ही पक्षांची आज पहिली संयुक्त बैठक पार पडली. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल? महाविकासआघाडी सत्तास्थापनेचा दावा कधी करणार? या प्रश्नांची उत्तरे आजच्या बैठकीनंतर मिळतील, अशा आशा राज्यातील जनतेला होत्या. परंतु महाविकासआघाडीच्या चर्चा अद्याप संपलेल्या नाहीत, असे चित्र आता दिसू लागले आहे. या बैठकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संयुक्त पत्रकार परिषद बोलावली होती. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जंयत पाटील या पत्रकार परिषदेला सामोरे गेले. यावेळी पृथ्वीराच चव्हाण यांनी सांगितले की, तिन्ही पक्षांमध्ये आज बैठक झाली. या बैठकीला तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत आमच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. परंतु अद्याप आमच्यातील चर्चा संपलेली नाही, उद्या आमची अजून एक बैठक होणार आहे. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्याशी माध्यमांच्या प्रतिनिधींनी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी पटेल म्हणाले की, आज आमच्यात चर्चा झाली आहे. उद्या पुन्हा आम्ही बसणार आहोत. दरम्यान, महत्त्वाच्या कामानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सर्वात आधी या बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर नेहरु केंद्राबाहेर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी माध्यमांना सांगितले की, मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्व पक्षांनी संमती दर्शवली आहे. नेहरु केंद्रात सुरु असलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह धरला होता, तसेच महाविकासआघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरेंनीच करावं, असा सूर या बैठकीत पाहायला मिळाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget